पुणे : नुवामा या ब्रोकरेज फर्मने सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडवर खरेदीची रेटिंग कायम ठेवली असून तिची लक्षित किंमत १,४५६ रुपये आहे. वार्षिक तसेच तिमाही या दोन्ही आधारावर कंपनीच्या किंमत वसुलीमध्ये सुधारणा झाल्याचे नुवामाने आपल्या अहवालात अधोरेखित केले आहे. नुवामाच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत सरासरी किंमत वसुली वार्षिक आधारावर ६ टक्क्याने वाढली आणि तिमाही आधारावर ३७ टक्के वाढून ₹१६,२९६ प्रति चौरस फूट झाली. गुरुग्राममधील प्रीमियम प्रकल्पांचा यात मोठा वाटा असल्यामुळे याला चालना मिळाली आहे.
सिग्नेचर ग्लोबल प्रीमियम निवासी बाजारपेठेत मजबूत स्थान मिळवत आहे. गुरुग्राममधील सेक्टर ७१ मध्ये ‘क्लोव्हरडेल एसपीआर’ या प्रीमियम गृहनिर्माण प्रकल्पाची सुरूवात हा त्यांच्या प्रीमियमायझेशन धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
कंपनी व्यवसाय विकासासाठी सक्रिय प्रयत्न करत आहे. सिग्नेचर ग्लोबलने या तिमाहीत सोहना येथे १० एकर जमीन विकत घेतली असून त्यात सुमारे ०.५३ दशलक्ष चौरस फूट विकासाची क्षमता आहे. मोठ्या संधी असलेल्या सूक्ष्म बाजारपेठेवर त्यांचे धोरणात्मक लक्ष असल्याचे त्यातून प्रतिबिंब पडते आणि भविष्यातील बळकट लाँच पाइपलाईन कायम राहण्यास त्यामुळे मदत होते.
सिग्नेचर ग्लोबलने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत २६.४ अब्ज रुपयांच्या प्री-सेल्स उत्पन्नाची नोंद केली. ही तिमाही आधारावर ६३ टक्क्यांची वाढ आहे. अनेक यशस्वी लाँच आणि सतत मागणी यांच्या आधारावर ही कामगिरी झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस कंपनीने निव्वळ कर्ज-ते-ऑपरेटिंग सरप्लसची पातळी ~०.५४ एक्स वर ठेवून स्वस्थ आर्थिक स्थिती राखली आहे. यातून भांडवलाचे शिस्तबद्ध वितरण दिसून येते.
आर्थिक वर्ष २६ मध्ये विक्रीपूर्व उत्पन्न १२५ अब्ज रुपये आणि संकलन ६० अब्ज रुपये हे आपले लक्ष्य सिग्नेचर ग्लोबलने कायम ठेवले आहे. त्यातून भविष्यातील वाढीवर दृढ विश्वास दिसून येतो. विक्रीच्या दमदार मजबूत गतीसह भविष्यातील लाँचला आधार मिळण्यासाठी जमिनीतील गुंतवणूक वाढू शकते. मात्र स्थिर संकलन आणि वाढत्या नफ्यामुळे रोखीचा मुक्त प्रवाह वाढण्याची अपेक्षा आहे. सिग्नेचर ग्लोबल आर्थिक वर्ष २७ पर्यंत नेट-कॅश बनण्याच्या मार्गावर आहे, असे नुवामाने म्हटले आहे.


