पुणे | पंजाब नॅशनल बँक (PNB) पुणे मंडळातर्फे MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्रातील ग्राहकांसाठी मासिक MSME आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश एमएसएमई ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अनुकूलित वित्तीय सोल्यूशन्स प्रदान करणे हा होता.
या कार्यक्रमात MSME केंद्रित कर्ज योजना, शासकीय योजनांमध्ये सहभाग, ग्राहक जागरूकता आणि वित्तीय साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला अनुज वर्मा (उप महाव्यवस्थापक, MSME प्रभाग, PNB मुख्यालय, दिल्ली) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
पुणे मंडळप्रमुख देवेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात विविध PNB शाखांचे वरिष्ठ व्यवस्थापक, क्लस्टर प्रमुख, आणि MSME बिझनेस पार्टनर (सीए) उपस्थित होते. कार्यक्रमात काही MSME लीड्सची तात्काळ मंजूरीही देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान MSME क्षेत्रासाठी असलेल्या योजनांची माहिती दिली गेली. बिझनेस पार्टनर आणि ग्राहकांनी PNB कडून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.