भोसरी:- दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कविता भोंगाळे युवा मंच, गायत्री सखी मंच व माणदेशी फाउंडेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमानाने वटपौर्णिमेनिमित्त खास महिलांकरिता नथ बनवणे कार्यशाळा गंगोत्री पार्क, भोसरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत दिघी,भोसरी परिसरातील शेकडो महिलांनी सहभागी होत कार्यशाळा यशस्वी पार पडली.
भाजपा चिटणीस सौ. कविताताई भोंगाळे – कडू यांच्या पुढाकाराने भोसरी परिसरात महिला, युवक- युवती, ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत व्हाही या सामाजिक भावनेतून वटपौर्णिमेनिमित्त खास महिलांसाठी नथ बनवणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले या कार्यशाळेत महिलांना विविध प्रकारच्या नथ बनवायला शिकवल्या गेल्या. तसेच नथ बनवण्यासाठी लागणारे साहित्य, किंमत याची माहिती देण्यात आली त्यासोबत आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या बाजारपेठेची माहिती कार्यशाळेत सहभागी महिलांना देण्यात आली.
यावेळी बोलताना सौ कविताताई भोंगाळे म्हणाल्या की आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना त्यांच्या आवडी निवडी जपता यायला हव्यात त्या दृष्टीने आम्ही गायत्री सखी मंचच्या माध्यमातून सदैव वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो. त्यास नागरिकांचा जो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतो त्यातून सामाजिक काम करायला एक प्रकारे प्रोत्साहन मिळत असते. आगामी काळात भोसरी, दिघी परिसरात होतकरू महिलांच्या साथीने बचत गटांची चळवळ मजबूत करत आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून महिलांनी गृहउद्योगाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
कार्यशाळेत माणदेशी फाउंडेशनच्या तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आले तसेच सहभागी प्रशिक्ष्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रभाग क्रमांक पाच महिला अध्यक्षा सौ. स्वातीताई शिर्के, सौ.शीला कदम, सौ. सुमन घोलप.सौ. जयश्री ढगे. सौ. कल्पना धाडसे, सौ मनीषा निकम,सौ.कविता जाधव आदी मान्यवरांसह भोसरी दिघी परिसरातील शेकडो महिला प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होते.
आपली विश्वासू