जागतिक मलेरिया दिन २५ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा एकमेव उद्देश डासांमुळे होणाऱ्या या प्राणघातक आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. मादी ॲनोफिलीसचावल्याने मलेरिया पसरतो. डासांच्या चाव्याव्दारे, परजीवी रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि लाल रक्त पेशींना संक्रमित करतात. त्यामुळे शरीरात खूप ताप आणि थरथरी होते. याशिवाय मलेरियाच्या बाबतीत इतर लक्षणेही दिसतात. वास्तविक मलेरियाच्या बाबतीत कोणताही विशेष आहार पाळण्याचा सल्ला दिला जात नाही. पण ताप आल्यास या गोष्टी खाल्ल्याने आणि काही गोष्टी टाळल्यास उपचारासोबत लवकर बरे होण्यास मदत होते.
मलेरियाच्या तापाची लक्षणे
खूप ताप, थंडी वाजून येणे, अस्वस्थता जाणवणे, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, पोटदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, जलद श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके वाढणे, खोकला.
काही लोकांना मलेरिया झाल्यानंतर मलेरिया सायकलचा अनुभव येतो. ज्यामध्ये थंडी वाजून थरीथरी होऊन ताप येतो आणि नंतर घामाने तापमान सामान्य होते. मलेरिया तापाची लक्षणे डास चावल्यानंतर काही आठवड्यांनी सुरू होतात