25.2 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeलाईफ स्टाईल  'स्त्री गौरव पुरस्कार २०२४'  सन्मान सोहळा 

  ‘स्त्री गौरव पुरस्कार २०२४’  सन्मान सोहळा 

सन्मान कर्तुत्ववान महिलांचा

पुणे : रॅम्प वॉक, महिलांसाठी रंगलेले विविध गेम्स, खेळ पैठणीचा मध्ये धम्माल मस्ती आणि लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट करत महिलांनी दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद लुटला. निमित्त होते  जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशन, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त आयोजित  कर्तुत्ववान महिलांना ‘स्त्री गौरव पुरस्कार 2024’ सन्मान सोहळ्याचे. 

अण्णाभाऊ साठे सभागृह सातारा रोड, पुणे येथे हा सन्मान सोहळा दुपारी 12 ते रात्री 8 या दरम्यान पार पडला.यावेळी सिने अभिनेत्री मेघना झुझम,अभिनेत्री आरती शिंदे, अभिनेता सिध्देश्वर झाडबुके, अभिनेता महेश सोनवणे,अभिनेत्री राधिका पिसाळ,कविता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई,फौडेशनचे उपाध्यक्ष आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, शितल पाटील, सचिन पाटील, शोभा पाटील आणि जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशनचे अध्यक्ष, माजी पोलिस उपायुक्त, अभिनेते, निर्माते आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे लीगल सल्लागार शहाजीराव एस. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. 

जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशन, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त  कर्तुत्ववान महिलांना ‘स्त्री गौरव पुरस्कार 2024’ देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये निवेदिका, लेखिका रुतुजा फुलकर, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक अश्विनी कामठे, तृतीयपंथी समाजसेविका कादंबरी शेख (टी.जी), गायिका प्रतिभा थोरात, समाजसेविका सुनीता मोडक, ह. भ. प. अर्चनादीदी साळूंखे (सगर) , प्राणी मित्र रंजना घाटपांडे, आरोग्यसेविका अंजु काझी,फॅशन डिझायनर सुमय्या पठाण आदींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
25.2 ° C
25.2 °
25.2 °
48 %
2.1kmh
0 %
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!