29.7 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeविश्लेषणमहाराष्ट्र सरकारची युवा विकासासाठी मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना

महाराष्ट्र सरकारची युवा विकासासाठी मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही “ मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना “ म्हणूनही ओळखली जाते. हा महाराष्ट्र सरकारने नुकतीच या योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्याच्या दृष्टीने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

महाराष्ट्र सरकारची युवा विकासासाठी मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही “ मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना “ म्हणूनही ओळखली जाते. हा महाराष्ट्र सरकारने नुकतीच या योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्याच्या दृष्टीने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

Maharashtra govt to spend Rs 5,500 crore on internship scheme giving stipend to unemployed youth

युवकांना रोजगार संधीदेणारी – ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’

  1. Analytical View
    महाराष्ट्रात दरवर्षी 11 लाखांहून अधिक विद्यार्थी पदवीधर होत असून राज्य सरकारने शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दरी कमी करण्याची वाढती गरज ओळखली आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना) या नव्या योजनेची घोषणा केली.

योजनेचे प्रमुख मुद्दे
नोकरी-प्रशिक्षण कालावधीवर भर: या योजनेद्वारे औद्योगिक आणि गैर-औद्योगिक आस्थापनांमधील पात्र तरुणांना व्यावहारिक तसच नोकरी-प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.

दुहेरी लाभ: या योजनेचा उद्देश उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करणे आणि त्याच वेळी तरुणांना मौल्यवान कौशल्ये आणि नोकरीच्या संधीं उपलब्ध करून देणे हा आहे.

आर्थिक सहाय्य: निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक विद्यावेतन मिळणार आहे.

12 वी उत्तीर्ण झालेल्यांना रुपये 6,000/- दरमहा.
ITI किंवा डिप्लोमा धारकांसाठी रुपये 8,000/- दरमहा.
पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधरांसाठी रुपये 10,000/- दरमहा.

वयोमर्यादा:
अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावे.

शिक्षण
इयत्ता 12, ITI, डिप्लोमा, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

अंमलबजावणी आणि परिणाम
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग या योजनेसाठी नोडल म्हणजे मध्यवर्ती केंद्र असेल.

यासाठी सरकारने अर्थसंकल्पात या योजनेच्या सुरळीत कामकाजासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महाराष्ट्रातील सुमारे 10 लाख तरुणांना या ऑन-द-जॉब प्रशिक्षण उपक्रमाचा फायदा होईल असा अंदाज आहे.

हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बेरोजगार तरुणांसाठी इंटर्नशिप अर्थात आंतरवासिता योजना सुरू केली आहे. ‘लाडकी बहिण योजने’ पासून प्रेरित होऊन ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ पुढे आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
69 %
3.8kmh
63 %
Sun
32 °
Mon
30 °
Tue
33 °
Wed
36 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!