रामकृष्ण हरी’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,’ आणि ‘ग्यानबा तुकाराम’चा जयघोष…..
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान 28 जून 2024 रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदी येथून 29 जून 2024 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.
महाराष्ट्रातील पालखी परंपरा ही श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक उत्सवाच्या चैतन्यशील अशा वेलबुट्टीदार कापडावरील नक्षीकाम आहे. वारकरी म्हणून ओळखले जाणारे हजारो यात्रेकरू दरवर्षी पंढरपूर या पवित्र नगरीकडे पूज्य संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या घेऊन पायी चालत जातात. वारी या नावाने ओळखला जाणारा हा अध्यात्मिक प्रवास वारकरी आणि भगवान विठ्ठल यांच्यातील गाढ नाते दर्शवतो. हा अध्यात्मिक प्रवास आणि सांस्कृतिकता अधिक सुलभ करण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पालखी महामार्ग हा प्रकल्प सुरू करण्यात आला.
वारी परंपरा आणि वारकरी :
वारी परंपरा ही शतकानुशतके जुनी प्रथा असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे भक्त संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन पायी यात्रा करतात. वर्षातून एकदा येणारी ही वारी म्हणजे पंढरपूर तीर्थक्षेत्राचे एक चैतन्यशील प्रदर्शन आणि वाटचाल असून यावेळी वारकरी भजन गाऊन अत्यंत प्रभावशाली आध्यात्मिक वातावरण तयार करतात.
या परंपरेचे महत्त्व तसच वारकऱ्यांची सुरक्षितता आणि कल्याण या गोष्टींची गरज लक्षात घेवून पालखी मार्ग प्रकल्पाची संकल्पना करण्यात आली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पायाभरणी केली.
पालखी महामार्ग म्हणजे काय?
पालखी मार्ग प्रकल्पामुळे वारकऱ्यांची सुरक्षितता आणि सोई यांमध्ये वाढ होण्याबरोबर पालखी मार्गावरील गावांमध्ये चैतन्यदेखील फुलते. या प्रकल्पामुळे अनेक मार्ग एकमेकांना जोडले जाण्याबरोबरच आर्थिक संधीं उपलब्ध होत असून त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. अल्पोपाहाराच्या सोयीपासून ते धार्मिक सामग्रीच्या विक्री केंद्रांपर्यंत तसेच निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते वाहतूक सेवा देण्यापर्यंतच्या आर्थिक घडामोडी घडून येत आहेत. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात समृद्धीचा प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
पालखी मार्ग : वारकऱ्यांसाठी आणि अर्थकारणासाठी वरदान
पंढरपूरची वारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यात्रा मार्गाच्या दोन प्रमुख भागांची पायाभरणी करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग दिवेघाट ते मोहोळ असा 221 किलोमीटरचा असून, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पाटस ते तोंडले-बोंडले असा 130 किलोमीटरचा आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे राबविण्यात येणारे हे प्रकल्प या मार्गांच्या दोन्ही बाजूंना पालखींसाठी समर्पित पदपथांसह चौपदरी महामार्गांच्या विस्तारित स्वरुपात असतील. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 6 हजार 6 शे 90 कोटी रुपये आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी सुमारे 4 हजार 4 शे कोटी रुपये इतका आहे.
सातारा, कोल्हापूर, सांगली, विजापूर, मराठवाडा विभाग आणि उत्तर महाराष्ट्र भागातून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना या महामार्गाची मोठी मदत होणार आहे. एक प्रकारे, हा महामार्ग भगवान विठ्ठलाच्या भक्तांच्या सेवेबरोबरच या संपूर्ण पवित्र प्रदेशाच्या विकासाचे माध्यमदेखील बनेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात केलं होतं.
‘रामकृष्ण हरी’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,’ आणि ‘ग्यानबा तुकाराम’चा जयघोष सर्वत्र घुमतो. वारीच्या या 21 दिवसांमध्ये आपल्याला इतर ठिकाणी अपवादात्मक आढळणारी शिस्त आणि उल्लेखनीय संयम इथे मात्र प्रकर्षाने दिसून येतो. असंख्य यात्रा वेगवेगळ्या पालखी मार्गांचा अवलंब करतात, तरीही त्या सर्व एकाच गंतव्यस्थानावर किंवा एकाच ठिकाणी एकत्र येतात. ही वारी भारताच्या कालातीत शिकवणुकीचे प्रतीक आहे, जे आपल्या विश्वासाला अमर्यादित बनवते. पंढरपूरची वारी आपल्याला आठवण करून देते की आपले मार्ग विविध असू शकतात त्याचबरोबर आपल्या पद्धती आणि कल्पनादेखील वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपले अंतिम ध्येय मात्र एकच आहे.