अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभन च कंबलम् ।
शंखा पालन धृतराष्ट्र तक्षकं कालियाम तथ ।
एतानि नव नमानि नागणां च महात्मानम् ।
तस्य विषभयाम् नास्ति सर्वत्र विजयी ।”
श्रावणमास म्हणजे सणांचा मास(महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा !या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला.श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं. तसेच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. त्यामुळे असं मानलं जातं की, या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली. ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं.
श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं. तसेच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. त्यामुळे असं मानलं जातं की, या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली. ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं.
प्राचीन काळापासून भारतात नागपंचमी हा लोकप्रिय सण…
पंचतंत्राच्या पाचव्या कथेत, सोने देणार्या सापाच्या उपमानात प्राचीन भारताच्या वैदिकोत्तर काळात सर्पपूजनाचा प्रचंड प्रसार असल्याचे संदर्भ आढळतात. पंचतंत्र हे पहिल्या ते सहाव्या शतकादरम्यान लिहिले गेले असल्याचे निश्चित झाल्याने, सहाव्या शतकापूर्वी भारतात सर्पपूजनाची परंपरा अस्तित्वात होती असे मानले जाते. सतराव्या शतकात भारताला भेट देणार्या प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी जीन बॅप्टिस्ट टेव्हर्निअरने सापाची पूजा मूर्तीच्या रूपात केली असल्याचे पाहिले. टेव्हर्निअरने या उत्सवाचे नाव सांगितलेले नाही किंवा अधिक तपशील दिला नाही, परंतु हे वर्णन आज सर्व भारतात साजरे केल्या जाणार्या नागपंचमी उत्सवाशी जुळते.
मध्ययुगीन काळापासून अस्तित्वात असलेल्या अनेक हिंदू मंदिरांच्या भिंतीवर सापांच्या कोरीव किंवा रंगीत आकृत्या आढळतात. सर्पपूजनाच्या विधींची प्रतिमाही जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पाहिली जाऊ शकते. प्रसिद्ध प्राचीन हिंदू तत्त्वज्ञ चाणक्य (इ.स.पू. ३००) यांच्या अर्थशास्त्रात नागाचे सविस्तर वर्णनही आढळते.
नागपंचमीच्या कथा…
सत्येश्वपरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्ववरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्ववरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते..
तसेच या सणाची दुसरी पौराणिक कथा अशी आहे की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट नाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व वातावरण विषारी होई. ज्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी). नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुध्दा पूजा करतात.
तिसऱ्या पौराणिक कथेनुसार, अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, त्याचा मुलगा जन्मेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला. ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले. सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषींनी राजा जन्मेजयाला समजावलं आणि हा यज्ञ थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्या दिवशी आस्तिक मुनींमुळे सापांचं रक्षण झालं. त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला.
नाग पंचमीचे महत्त्व
हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी शेतात नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं. नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूचे आसन देखील आहे. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही, असे मानले जाते.
बत्तीस शिराळा. महाराष्ट्र राज्याचा सांगली जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. ते नागपंचमीच्या सणासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
साधारण १२०० वर्षापासून येथे जिवंत नागाची पूजा केली जात होती. येथील जिवंत नागाच्या पुजेची सुरुवात गोरक्षनाथांनी केली होती, नाथांनी ही नागाची भीती लोकांमधून निघून जावी यासाठी जिवंत नागाची पूजा केल्याचे बोलले जाते. पुढे तेव्हापासून या परंपरेला सुरूवात झाली. नागपंचमीच्या काही दिवस अगोदर शिराळा परिसरात नाग पकडण्यासाठी हातात मोठी काठी, मडके घेऊन युवक फिरत असतात. नाग पकडण्याची कला येथील युवकांमध्ये आहे आणि ती परंपरेने आली आहे. नाग पकडून पूजा झाल्यानंतर त्याच ठिकाणी ते नाग सोडले जातात. शिराळा येथील युवकांमध्ये नागाविषयी एक वेगळे प्रेम, आपुलकी आहे.