39.2 C
New Delhi
Sunday, June 1, 2025
Homeमहाराष्ट्रगृहनिर्माण संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवत सभासदांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे

गृहनिर्माण संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवत सभासदांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

पुणे : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण संस्था असून तेथील मतदारांची संख्या अधिक आहे. शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्यादृष्‍टीने गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रम राबवत सभासदांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्राद्वारे केले आहे.

जिल्ह्यातील पुणे, शिरुर व मावळ लोकसभा मतदार संघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदान जागृतीसाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा. सभासदांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थांनी विशेष सभा बोलावून सभासदांना मतदानाचे आवाहन करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मतदानाच्या तारखेचा उल्लेख असलेली निवडणूक विषयक भित्तीपत्रके संस्थेच्या दर्शनी भागात लावावीत, सभासदांना मतदार यादीत नाव शोधून देणे, मतदार ओळख चिठ्ठी पोहोचविण्यास केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मदत करावी. पात्र मतदारांची यादी तयार करुन मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान केलेल्या मतदारांची नोंद घ्यावी, वृद्ध व दिव्यांग सभासदांसाठी मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी शक्य असल्यास वाहनाची व्यवस्था करावी, दुपारपर्यंत मतदान न केलेल्या सभासदांच्या भेटी घेऊन मतदान करण्याबाबत प्रेरित करावे, मतदान केलेले सभासद व नवमतदारांना गुलाबपुष्प अथवा भेट वस्तू देऊन सोसायटीमधील विशेष सोहळ्यात गौरविण्यात यावे, असे आवाहनही डॉ. दिवसे यांनी केले आहे.

मतदान जागृती उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गृहनिर्माण संस्थांमधील लेखापरीक्षकांच्या मदतीने सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपापल्या मतदार संघाशी निगडीत अधिकारी कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवावा. जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधावा, अशा सूचनाही डॉ.दिवसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
39.2 ° C
39.2 °
39.2 °
32 %
4.9kmh
13 %
Sun
38 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!