28.1 C
New Delhi
Saturday, October 25, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिकाची धमाकेदार वाटचाल सुरू

सोनालिकाची धमाकेदार वाटचाल सुरू

एप्रिलमध्ये एकंदर ११,६५६ ट्रॅक्टरची विक्री

पुणे : आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंतची एकंदर वार्षिक विक्रीची विक्रमी कामगिरी नोंदवल्यानंतर, भारताचा क्रमांक एक  ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने मजबूत नवीन प्लॅटफ़ॉर्मसह आर्थिक वर्ष २०२५ मध्येही आपला प्रवास चालू ठेवला आहे. कंपनीने एप्रिलमध्ये संपलेल्या वर्षात एकंदर ११,६५६  ट्रॅक्टर विक्रीचा नवा विक्रम नोंदविला आहे. तसेच आपल्या समर्पित प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर बाजारपेठेत अधिक वाटा काबिज केला आहे.

सोनालिकाच्या होशियारपूर येथील जगातील क्रमांक एक च्या कारखान्यातून बाहेर पडणारा प्रत्येक नाविन्यपूर्ण ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांसाठी उत्पादकता आणि नफा याबाबत उत्कृष्टता घेऊन येतो. हेवी ट्रॅक्टर श्रेणीत दर्जा आणि कामगिरी यांचे परिपूर्ण मिलाफ घडविण्याचा सोनालिकाच्या ध्यास असल्यामुळे कंपनीला भारतात तिसरा सर्वात मोठा ट्रॅक्टर बनण्यास मदत झाली आहे. भारत ही जगातील ट्रॅक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कंपनीने या अगोदरच ५ वर्षांची वॉरंटी देण्यास तसेच आपल्या वेबसाईटवर ट्रॅक्टरच्या किमती दर्शविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आपल्या शेतीच्या कामात एक विश्वासू साथीदार म्हणून सोनालिकाकडे पाहण्यास शेतकऱ्यांना नेहमीच आनंद वाटतो.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, आम्ही एप्रिल २४ मध्ये एकंदर ११,६५६ ट्रॅक्टरची विक्री नोंदवली असून ट्रॅक्टरची बाजारपेठही काबिज केली आहे. अशा प्रकारे आर्थिक वर्ष २०२५ चा प्रवास सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या प्रगत हेवी ड्यूटी ट्रॅक्टर सीरीजने शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवीन संधींची दारे उघडून दिली आहे. त्यामुळेच आमच्या १५ लाखांपेक्षा शेतकऱ्यांच्या परिवाराचा आम्हाला अभिमान वाटतो.

त्याच सोबत एल-निनो प्रभाव कमी-कमी होत असून येत्या वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे धरणांमध्ये लवकरच सामान्य पातळीपर्यंत पाणीसाठी होण्याची अपेक्षा असून त्यामुळेही येत्या वर्षात चांगली मागणी येईल. अमर्याद संधींचे नवीन वर्ष पुढ्यात असताना शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये नवीन उत्पादने सादर करण्याचा आम्हाला विश्वास आहे कारण काय-काय साध्य करता येईल याला कोणतीही सीमा नाही, असा आम्हाला विश्वास आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
42 %
0kmh
0 %
Sat
29 °
Sun
33 °
Mon
32 °
Tue
31 °
Wed
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!