8.1 C
New Delhi
Friday, January 3, 2025
Homeआरोग्यपंचविशीनंतर प्रत्येक मुलीने ‌’हे‌’ पदार्थ खाल्लेच पाहिजे

पंचविशीनंतर प्रत्येक मुलीने ‌’हे‌’ पदार्थ खाल्लेच पाहिजे

निरोगी आरोग्यासाठी ठरेल सुपरफुड

वयाच्या पंचविशीनंतर खऱ्या अर्थाने खडतर आयुष्याचा टप्पा सुरू होतो. तरुणीच्या आयुष्यातही वयाच्या या टप्प्यावर अनेक उलथापालथी होत असतात. काही जणी उच्च शिक्षणासाठी मेहनत घेत असतात. तर, काही जणी करिअरसाठी धडपडत असतात तर, काहींचा संसार सुरू झालेला असतो. अशावेळी महिलांनाही पौष्टिक अन्नाची गरज असते. दिवसभराची धावपळ करण्यासाठी शरीरात उर्जा असणे गरजेचे असते. वयाच्या पंचविशीचा टप्पा गाठल्यानंतर प्रत्येक मुलींनी ही भाजी आवर्जून खावी, याचे फायदे जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
धावपळीच्या जगात प्रत्येकीने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी डाएटमध्येही हेल्दी गोष्टींचा समावेश करावा. यामुळं आरोग्य निरोगी ठेवण्यास, हार्मोन्स बॅलेन्स ठेवणे, शरीरातील उर्जा कायम ठेवणे, पाळीच्या दिवसांतील वेदना आणि मूड स्विंग्स कमी करते. त्यामुळं मुलींनी या वयात कोणत्या गोष्टी खाव्यात, याची यादी जाणून घेऊया.
हेल्दी कार्बोहायड्रेटस
कार्बोहायड्रेट उर्जेचा मुख्य स्त्रोत असतो. महिलांमध्ये मसल्सच्या तुलनेत फॅट सेल्सअधिक प्रमाणात असते. त्यामुळं त्यांचे वजन लवकर वाढते. जर मुलींनी सुरुवातीपासून योगा किंवा व्यायाम केल्यास शरीरात फॅट नियंत्रणात राहिल. यामुळं शरीरात एनर्जी कायम ठेवण्यासाठी व वर्कआउटसाठी ताकद मिळण्यासाठी कॉम्पलेक्स कार्बची गरज असते. कॉम्पलेक्स कार्बमध्ये होल ग्रॅन, ओटस, होल व्हीट पास्ता यासारखे पदार्थ असतात.


हेल्दी फॅटस
शरीराला हेल्दी फॅटसचीदेखील आवश्यकता असते. अनसॅच्युरेटेड फॅटस हेल्दी असल्याचे मानले जाते. ज्या गोष्टींमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असते ते पदार्थ डाएटमध्ये सामील करा. सॅल्मन मासा, बदाम, आक्रोड, सुकामेवा, ऑॅलिव ऑॅइल, माशाचे तेल यासारखे पदार्थांचे सेवन करा. हेल्दी फॅटचे सेवन केल्यास शरीरात सेरोटोनिन नावाच्या हॅपी हार्मोन्सची मात्रा वाढते. ज्यामुळं आनंद व्यक्त करता येतो. त्याचबरोबर हेल्दी फॅड रक्तपुरवठाही नियंत्रणात ठेवतो. हृदयाचे आरोग्यही निरोगी ठेवते, बॅड कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करतो. हाडांमधील वेदना कमी करते.

प्रोटीन
प्रोटीन शरीरातील मसल्स वाढवण्यासाठी सगळ्यात फायदेशीर आहे. त्याचबरोबर प्रोटीन केसाच्या आणि नखांच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळं मुलींनी प्रोटीन फुड असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. प्रोटीन असलेले पदार्थ खाल्ल्यास हाडांना बळकटी येते आणि शरीरात स्ट्रेंथदेखील येते. अंडे, पनीर, चिकन, डाळ, सोयाचंक या पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते.

आयरन
मुलींच्या शरीरात मासिक पाळीमुळं आयरनची कमतरता भासते. त्यामुळं त्यांनी लोहयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. बीट, आवळा, पालक, डाळिंब यांचा आहारात समावेश केला पाहिजे.


फायबर
फायबरमुळं पाचनसंस्था सुधारते. असं म्हणतात की जास्तीत जास्त आजार हे पाचनसंस्था बिघडल्यामुळं होतात. हिरव्या पालेभाज्या किंवा सलाड खाल्लामुळं आरोग्य हेल्दी राहते. यात फायबरची मात्रा अधिक प्रमाणात असते. ज्यामुळं मुलींचे आरोग्य सुधारते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
8.1 ° C
8.1 °
8.1 °
100 %
0kmh
100 %
Fri
24 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °
Tue
21 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!