घरात उंदीर दिसला की डोकं फिरून जातं. कारण उंदीर कोणत्या वस्तूंची कशी वाट लावतील सांगता येत नाही. सोपा, वायर, इलेक्ट्रिक गॅझेट, महत्त्वाची कागदपत्रं कधी कुडतडतील सांगता येत नाही. कित्येकदा या उंदारापासून जीवघेणे आजार देखील पसरतात. त्यामुळे उंदीर घराच्या आसपाससुद्धा नको अशी भावना असते. अनेकदा उंदरांना पळवून लावण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. पण ही औषधं खाऊन उंदीर तिथेच मरतात आणि संपूर्ण घरात आणि आसपास दुर्गंधी पसरते. दुसरीकडे काही लोक धार्मिक कारणास्तव औषधांचा वापर करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला उंदरांना पळवून लावणाऱ्या घरगुती उपयांबाबत सांगणार आहोत. जेणेकरून उंदराच्या त्रासापासून तुमची सुटका होईल.
माणसाचे केस (human hair): माणसांच्या केसांचा उपाय प्रभावी ठरू शकतो. उंदरांनी केस खाल्ल्यास ते मरतात. त्यामुळे केस ठेवलेल्या ठिकाणी ते फिरकत सुद्धा नाही. जर घरातील चार-पाच ठिकाणी केस ठेवल्यास उंदीर त्या ठिकाणी फिरकणार नाहीत.
कांद्याचा वास (Onion): उंदरांना कांद्याचा वास सहन होत नाही. कांद्याच्या उग्र वासामुळे उंदरांना अस्वस्थ होतं. कांद्याचे ७-८ तुकडे करून घरातील काही भागात ठेवा. या वासामुळे उंदीर तेथून पळून जातील.
फिनाइलच्या गोळ्या: उंदराना पळवून लावण्यासाठी सर्वोत्तम उपयांपैकी एक आहे. गोळ्यांची पुरचुंडी बांधून घरातील काही भागात ठेवा. त्यानंतर घरात तुम्हाला उंदीर दिसणं बंद होतील.
तमालपत्र (bay leaf): या पानांना आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या पानांचा वास उग्र असतो. घरातील काही भागात तमालपत्राची पावडर ठेवल्यास प्रभावी ठरू शकते. उंदीर घरातून पळून जातील.
Post Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या
पुदीना (Pudina): उंदरांना पळवून लावण्यासाठी पुदीना देखील कामाचा आहे. पुदीनाची पान सुकवून बारीक पावडर करा. उंदीर फिरत असलेल्या ठिकाणी टाका. काही दिवसातच तुम्हाला प्रभाव दिसून येईल.
उंदरांना न मारता असं पळवून लावा
जाणून घ्या ५ घरगुती उपाय
New Delhi
smoke
25.1
°
C
25.1
°
25.1
°
36 %
2.1kmh
0 %
Fri
27
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°