मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूं चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळविला. शनिवारी १८ मे रोजी झालेल्या या सामन्यात विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर संघाला प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होती. आरसीबीनं सामना जिंकल्यावर अनुष्का आणि विराट दोघेही भावूक झाले. या विशेष प्रसंगी या जोडप्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अनुष्का आणि विराटची भावनिक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
अनुष्का शर्मा झाली भावूक : सामना पाहण्यासाठी आलेल्या अनुष्का शर्माची प्रतिक्रिया पाहून आरसीबीचा चाहतेदेखील भावूक झाले. विराट कोहली जिंकताना पाहून अनुष्का शर्मा ही खूप आनंदी झाली. ती सीटवर उभी राहून टाळ्या वाजवू लागली. यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रूही दिसत होते. या आनंदाच्या क्षणी विराटचेही डोळे भरून आले. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या चालू हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा आणि शेवटचा संघ ठरला. गेल्या पाच हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं प्लेऑफमध्ये चार वेळा प्रवेश केला आहे. आता ते अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २२ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध एलिमिनेटर खेळतील.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स (आरआर), कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ देखील प्लेऑफमध्ये सामील झाले आहेत. पहिला प्लेऑफ सामना २१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. २६ मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अंतिम सामना खेळला जाणार आहे. अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं ती शेवटी ’झीरो’ चित्रपटामध्ये दिसली होती. आता पुढं ती ’चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
अनुष्का शर्मासह विराट कोहली झाले भावूक
आरसीबी आयपीएल प्लेऑफमध्ये सामील झाल्याचा आनंद मावेना!
New Delhi
haze
33.1
°
C
33.1
°
33.1
°
58 %
3.1kmh
40 %
Fri
35
°
Sat
38
°
Sun
38
°
Mon
38
°
Tue
38
°