तान्ह्याबाळाला अन्नप्राशन साधारणतः वयाच्या पाचव्या ते सहाव्या महिन्यापासून चालू केले जाते .सहा महिन्यानंतर बाळाची भूक वाढते.अंगावरचे दूध पुरेनासे होते.त्यामुळेबाळाला आईचे दूध सुरु ठेवून वरचा आहार चालू करावा लागतो ,म्हणूनच या आहाराला कॉमप्लीमेंटरी किंवा पुरक आहार म्हणतात.साधारण १५ ते १८ महिन्यापर्यंत बाळ पूर्ण आहार घेण्यास चालू करते पणतोपर्यंत आईचे दूध पुरक आहारासोबत चालू ठेवावे.अन्न केवळ शरीराचे पोषण करत नाही तर मन,बुद्धी,ऊर्जा यांचेही पोषण करते.सहा महिन्यापुर्वी बाळाची पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यामुळे पुरक आहारद्यायची घाई करून नये.बाळाचे अन्नप्राशन ते पूर्णआहार हळूहळू कसा वाढवावा याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात.

- बाळाला भरवताना स्वच्छ वाटी चमचा यांचा वापर करावा.बाटलीचा वापर करू नये,आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत.
- बाळाला मांडीवर घेऊन डोके थोडे उंचावर धरून खायला द्व्यावे.आडवे धरून देऊ नये,बाळ बसायला लागल्यावरखुर्चीत बसून खायला द्व्यावे.खायला देताना बाळासोबत गप्पा-गोष्ठी करव्यात,त्यामुळे तुमचा आणि बाळाचा भावनिक बंधही निर्माण होईल आणि बाळाचा बौद्धिक विकास होण्यास मदत होईल.मोबाईलचा वापर टाळावा.
- बाळाला सुरवातीला पाणी आणि पातळ पदार्थ देण्यास सुरवात करावी.डाळ भाताची पेज देण्यास सुरवात करावी.बाळाला सहाव्या महिन्यापर्यंत दात नसतात त्यामुळे अन्न चावता येत नाही म्हणून पातळ पेज बनवून खाऊघाला.
- बाळाला स्तनपानासह पुरक अन्न म्हणून वरणभात,खिचडी,भाज्या घालून केलेली खिचडी,भरड किंवा आंबील आणि फळे कुस्ककरून द्यावित.
- एकावेळी एकच नवीन पदार्थ सुरू करावा.३ ते ४ दिवसतो पदार्थ द्व्यावा ते व्यवस्थित पचल्यानंतरदुसऱ्या पदार्थाचा प्रयोग करावा.कोणत्या पदार्थाची अॅलर्जी असेल,पचत नसेल तर ते तुम्हाला लक्षात येईल आणि तो पदार्थ एकत्र दिले तर पचनास अवघड ही जाईल आणि कशामुळे त्रास झाला हे ही लक्षात येणार नाही.
- याकाळात बाळांना लोहाची गरज मोठ्या प्रमाणात असते.भाज्या-फळे योग्य प्रमाणात आहारात घेत्ल्य्स ही गरज भरून निघते.
- केळी,सफरचंद,पपई,चिक्कू,आंबा ही फळे वाफवून हाताने कुस्करून किवा दुधामध्ये मिसळून देऊ शकता.
- भोपळा,बटाटा,गाजर,रताळे,हिरवे वाटाणे भातामध्ये शिजवून किंवा कुस्करून देऊ शकता.
- डाळ,तांदूळ १:२ प्रमाणात घेऊन ते भिजवून,वाळवून मिक्सरमध्ये बारीक करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता.त्यामुळे तुम्हाला आयत्यावेळी बाळाला पेज बनवून देता येईल आणि तुमचा वेळही वाचेल.
- साधारण आठव्या महिन्यानंतर घरी लावलेले ताजे दही तुम्ही सुरु करू शकता.
- अंडी उकडून घेऊन त्यामधील बलक कुस्करून तुम्ही बाळाला देऊ शकता.
- हळूहळू नाचणी सत्वाची पेज चालू करावी.
- संत्री,मोसंबी यासारखी फळे काही दिवसांनी सुरु केली तरी चालतील.
- गाईचे दूध,म्हशीचे दूध स्तनपान चालूआहे तोपर्यंत कमी प्रमणात द्व्यावे.नाहीतर पोट दुधानेच भरेल आणि बाळाला भूक लागणार नाही.

काय टाळावे:-
- बाळ एक वर्षाचे होईपर्यंत कोणत्याही पदार्थात मीठ,साखर,गुळ घालू नये.बाळाला शर्करा,कॅलरीज,कार्बोहायड्रेट नैसर्गिक फळांमधून,पदार्थांमधून मिळू देत,वरतून साखर,मीठ,गुळ,मध दिल्याने भविष्यात लठ्ठपणा,मधुमेह आणि उच्चरक्तदाब यांसारख्या आजारांना समोर जावे लागते.
- द्राक्षे,शेंगदाणे,काजू,डाळिंबाचे दाणे घशात अडकू शकतात ते देऊ नये.
- मासे,सोयाबीन,अंड्याचा पांढरा भाग यांची अॅलर्जी होण्याची शक्यता असते.त्यामुळे एक वर्षापर्यंत देऊ नये.
- बाटलीबंद रसाचा वापर टाळा
बाजारात रेडीमेड फूड्स मिळतात
पण घरचे ताजे अन्न बाळासाठी “सर्व्वोत्तम”.
.