14.1 C
New Delhi
Friday, December 27, 2024
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिका ट्रॅक्टर ने पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ४१,४६५ ट्रॅक्टरची केली विक्री

सोनालिका ट्रॅक्टर ने पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ४१,४६५ ट्रॅक्टरची केली विक्री

सर्वाधिक १४.४ टक्के (अंदाजे) वाटा

पुणे : भारतातील क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यातीचा ब्रँड असलेली सोनालिका ट्रॅक्टर्स आपल्या शक्तिशाली परंतु इंधन किफायतशीर ट्रॅक्टरच्या माध्यमातून ‘भारतामध्ये दर्जा’ प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असून आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठताना कंपनी उत्साहित आहे. कंपनीने ४१,४६५ ट्रॅक्टरची एकंदर विक्री करून पहिल्या तिमाहीतील आजवरची सर्वाधिक विक्रीची कामगिरी केली आहे. तसेच बाजारपेठेतील आजवरचा सर्वाधिक १४.४ टक्के (अंदाजे) वाटा काबीज केला असून उद्योगाच्या कामगिरीपेक्षा दुप्पट वाढीची नोंद केली आहे.

दर्जावर लक्ष केंद्रित करण्याच्या आपल्या दृष्टिकोनामुळे कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत जूनमधील आपली सर्वोत्तम कामगिरी सुद्धा नोंदविली असून १४,०६२ ट्रॅक्टरची विक्री केली आहे. यामध्ये १६.६ टक्के विक्रीच्या वाढीचा तसेच १.४ टक्के बाजारपेठेतील वाट्याच्या वाढीचा समावेश आहे. ट्रॅक्टरच्या सर्व ब्रँडमध्ये ही सर्वोच्च पातळी आहे. कंपनीने जून २०२३ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत १२,०५६ ट्रॅक्टरची विक्री केली होती. कृषी तंत्रज्ञान उत्पादने अधिकाधिक शेतकरी केंद्रित होत असताना “भारताचा अभिमान” असलेल्या सोनालिकाने शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांना आपल्या हेवी ड्युटी ट्रॅक्टरच्या माध्यमातून अधिक शक्ती आणि दमदार दर्जा यांचा लाभ घेण्याची संधी दिली आहे.
या विक्रमी कामगिरीबाबत आपल्या भावना व्यक्त करताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एकंदर ४१,४६५ ट्रॅक्टरच्या विक्रीद्वारे पहिल्या तिमाहीतील आमच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करून आणि पहिल्या तिमाहीतील १४.४टक्के (अंदाजे) एवढा एकंदर बाजारपेठेतील वाटा मिळवून तसेच उद्योगापेक्षा दुप्पट कामगिरी करून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. जून २०२४ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत १४,०६२ ट्रॅक्टरची अचंबित करणारी विक्री करून हे साध्य झालं आहे. यातून विक्रीमध्ये १६.६ टक्के विक्रमी वाढ तसेच १.४ टक्के बाजारपेठेतील वाट्यात वाढ नोंदली गेली आहे. ट्रॅक्टरच्या सर्व ब्रँड्समध्ये हे दोन्ही सर्वोच्च आकडे आहेत.

पावसाळ्याचे लवकर आगमन झाल्यामुळे भारताच्या कृषी क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे कारण आर्थिक वर्ष २०२५ मध्ये खरिपाची लागवड ३० टक्क्यांनी वाढली आहे. पावसाळ्याच्या दुसऱ्या भागात ला नीना स्थिती वेग पकडण्याची शक्यता असून त्यामुळे पावसाची सध्याची कमतरता भरून निघण्याची शक्यता आहे. आपल्या शिस्तबद्ध आणि दर्जाकेंद्रित दृष्टिकोनातून भारतातील शेतीच्या विकासाला चालना देणाऱ्यांमध्ये पहिल्या रांगेत असण्याचा सोनालिकाला अभिमान आहे. नवीन कृषी तंत्रज्ञान यंत्रसामुग्री डिझाईन करण्यासाठी विकसित करण्यासाठी व त्यावर विचारमंथन करण्यासाठी आमच्या टीम्स परिणामकारकपणे एकमेकांशी सहकार्य करतात. त्यामुळे शेती अधिकाधिक शाश्वत होते. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये प्रमुख भूमिका निभावण्यासाठी या टीम्स अत्यंत उत्सुक आहेत.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
drizzle
14.1 ° C
14.1 °
14.1 °
88 %
1.5kmh
75 %
Fri
23 °
Sat
18 °
Sun
21 °
Mon
22 °
Tue
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!