33.9 C
New Delhi
Tuesday, May 13, 2025
HomeBlogपुण्यातील निवडुंग विठोबा मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते आरती...

पुण्यातील निवडुंग विठोबा मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न

पुणे- विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दि. १७ जुलै रोजी पुण्यात विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले. पुण्यात गणेश पेठेतील निवडुंग विठोबा मंदिर येथे आज आषाढी एकादशी निमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. 

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री,लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या अत्यंत कुशल मार्गदर्शनात या वर्षीची आषाढी एकादशी हर्षोल्लासात साजरी होत असून, पुण्यात देखील डॉ. गोऱ्हे यांच्यासह शिवसैनिकांनी आषाढी एकादशी मनोभावे साजरी केली.

महायुती शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, सामान्य कामगारांसाठी जे काम करत आहे. ते काम अधिक करण्यासाठी बळ मिळो अशी भावना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली.माननीय नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाल्याबद्दल व शिवसेनेचे आठ खासदार निवडून आल्याबद्दल पांडुरंगाचे आशीर्वाद निवडणुकीत आम्हाला मिळाले अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

तसेच, मुखमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजिदादा पवार जे महाराष्ट्रात विकासाचे काम करतायेत त्यासाठी त्यांना आशीर्वाद द्यावा याच्याबद्दल विठुरायाकडे प्रार्थना यावेळी केली अशी भावना यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेना पुणे शहराचे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, विशाल धनवडे (माजी नगरसेवक), शिवसेना सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी सुदर्शनाताई त्रिगुनाईत, महिला आघाडी शहर प्रमुख श्रुतीताई नाझिरकर, श्रद्धाताई शिंदे, सुरेखाताई कदम, कांताताई पांढरे, शहर समन्वयक धनंजय जाधव, युवराज शिंगाडे, युवा सेना शहर संघटक गणेश काची, कौस्तुभ कुलकर्णी, निलेश जगताप, आकाश शिंदे व शहरातील सर्वच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
33.9 ° C
33.9 °
33.9 °
26 %
3.7kmh
28 %
Tue
41 °
Wed
44 °
Thu
45 °
Fri
46 °
Sat
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!