20.1 C
New Delhi
Thursday, October 23, 2025
Homeमहाराष्ट्ररोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी गौतम शहा तर सचिवपदी कल्याणी कुलकर्णी

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी गौतम शहा तर सचिवपदी कल्याणी कुलकर्णी

पिंपरी : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी गौतम शहा यांची तर सचिवपदी कल्याणी कुलकर्णी यांची 2024-25 साठी निवड झाली आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा यांनी दोघांना पदभार दिला.

पुनावळे येथे शुक्रवारी हा पदग्रहण समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्या देशपांडे हिने गणेश वंदना सादर केली. नवनिर्वाचित अध्यक्ष गौतम शहा म्हणाले, की आगामी वर्षभरात विविध समाजउपयोगी प्रकल्प राबविण्याचा माझा संकल्प आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुली, महिलांच्या आरोग्यासाठी विविध वैद्यकीय शिबिरे घेण्याचा मानस आहे. दहा हजार रुग्णांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी केली जाणार आहे. एचबी असल्यास दर तीन महिन्यांनी तपासणी करण्यात येणार आहे. औद्योगिकनगरीत विविध कंपन्या आहेत. या कंपन्याकडून विविध उपक्रमांसाठी सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) निधी घेतला जाणार आहे. क्लबचे सभासद देखील वाढविण्यावर माझा भर राहणार आहे.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा म्हणाले, कंपन्यांना सीएसआरसाठी निधी द्यायचा असतो. त्यासाठी त्यांच्यापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. त्यातून आपण विविध समाजउपयोगी प्रकल्प राबवू शकतो. काम करण्यासाठी मोठी संधी आहे. सर्वांनी सभासद वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. तर, सुकन्या समृद्धी प्रकल्प, महिलांची, शाळकरी मुलांची आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. गुड आणि बॅड टचबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने घेतले. गरजू रूग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत केल्याची माहिती मावळते अध्यक्ष शशिकांत शर्मा यांनी दिली.

अशी आहे नवीन कार्यकारिणी

अध्यक्ष गौतम शहा
सचिव कल्याणी कुलकर्णी
आयपीपी शशिकांत शर्मा
खजिनदार गौरव शर्मा
डायरेक्टर पीआय रवी नामदे
क्लब ऍडमीन रामेश्वर लाहोटी
तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष उमंग सालगिया
डायरेक्ट मेंबर राजेंद्र तुपे
फाउंडेशन डायरेक्टर संतोष अगरवाल
प्रकल्प अधिकारी जसविंदर सोकी
सेवा प्रकल्प संचालक आनंदिता मुखर्जी
सुकन्या प्रकल्प संचालक साधना दातीर
डायरेक्टर पीआय शीमा शर्मा
युवक सेवा प्रमुख आरती कुरा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
88 %
1kmh
0 %
Thu
33 °
Fri
33 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!