पुणे : वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ यशस्वी युवा वैद्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद वाचस्पती वैद्य प्रयाग प्रदीप सेठीया यांना यंदाचा पुरस्कार purskar जाहीर झाला आहे.दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ नामांकित वैद्य धनंजय कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या निमित्ताने ‘पक्षवध व्याधी मध्ये विविध कल्पांचा अवस्थेनुरूप विचार’ या विषयावर ते बोलणार आहेत.आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य जगणाऱ्या कै. वैद्य चंद्रकांत यांनी वैद्य परंपरेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. उत्तम उत्तम वैद्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या विचारांचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी युवा वैद्य पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष आहे.
वैद्य प्रयाग सेठीया यांना यशस्वी युवा वैद्य पुरस्कार जाहीर
वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजन
RELATED ARTICLES
New Delhi
scattered clouds
34.8
°
C
34.8
°
34.8
°
54 %
2.9kmh
43 %
Fri
36
°
Sat
41
°
Sun
37
°
Mon
31
°
Tue
37
°