पुणे, – अलार्ड विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. पूनम कश्यप यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ.एल.आर.यादव यांनी केली आहे. यावेळी डॉ. राम यादव व विद्यापीठाचे मार्केटिंग विभागाचे संचालक पी.ए.व्ही.शेखर उपस्थित होते.
डॉ. पूनम कश्यप यांनी इंग्लड येथील अल्स्टर बिझनेस स्कूलमधून एमबीए आणि एनर्जी मॅनेजमेंटमध्ये पीएचडीPHD केली आहे. त्यांना २० वर्षाहून अधिक काळ संशोधन व प्रोफेशनल शिक्षपदाच्या कार्याचा अनुभव आहे. त्यांनी बांधकाम मॅनेजमेंट, शाश्वत विकास आणि आर्थिक मूल्यमापन या विषयांवर विशेष कार्य केले आहे.
डॉ. एल.आर. यादव म्हणाले,” डॉ. कश्यप यांची अलार्ड विद्यापीठाला व्यापक अनुभव आणि धोरणात्मक कौशल्यांचा लाभ होईल. विद्यापीठाचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर सकारात्मक परिणाम होईल. जागतिक दर्जाचे हे विद्यापीठ आणि उत्कृष्टतेचे दीपस्तंभ बनेल, नाविन्यपूर्ण ज्ञानाला चालना देणे व उद्योजकतेच्या संस्कृतीचे पालनपोषणाचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना केवळ नोकरी करणारे न बनविता उद्योजक निर्माते बनविण्याचा आमचा मानस आहे.”
डॉ. पूनम कश्यप म्हणाल्या,” पदभार स्वीकारतांना अत्यंत आनंद व अभिमान वाटतो. नावीन्यपूर्ण, उत्कृष्टतेची आमची सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रतिभावन प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसोबत काम करून विद्यापीठाला उत्कृष्ट बनविण्यासाठी प्रयत्न करेल.”
अलार्ड विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. पूनम कश्यप
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
28
°
C
28
°
28
°
34 %
2.2kmh
0 %
Fri
28
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°