‘
पुणे : आजवर विविध विषयांवरआधारित नाटके रंगमंचावर आली आहेत. अशातच आता सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला’ हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. 22 ऑगस्ट 2024 रोजी बालगंवर्ध रंगमंदिर पुणे येथे रात्री 9.00 वा. तर 23 ऑगस्ट 2024 रोजी पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात रात्री 9.00 वा. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
‘आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज’च्या सहकार्याने हे नाटक रंगभूमीवर येते आहे. ‘आर्यन ग्रुप’ विविध क्षेत्रात कार्यरत असून आता ही कंपनी ‘सुमुख चित्र’च्या माध्यमातून नाट्य क्षेत्रात पदार्पण करत आहे. नवोदित कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मुख्य हेतू आहे. निखिल जाधव सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माते आहेत. नवे नाते निर्माण करताना किंवा असलेले नाते जपताना, महत्त्वाचा असेलला दृष्टिकोन व विश्वास आपण जाणीवपूर्वक निर्माण करतो का, योग्य वेळी तो वापरतो का, हे ‘पाहिले न मी तुला’ या नाटकातून दाखवण्यात येणार आहे. लेखक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध यातून घेतला आहे. अंशुमन विचारे, हेमंत पाटील, सुवेधा देसाई या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
सध्या जमाना फिल्टरचा आहे. एखादी गोष्ट अधिक छान असावी यासाठी फिल्टरचा वापर केला जातो. नवे नाते निर्माण करताना किंवा असलेले नाते जपताना महत्त्वाचा असलेला फिल्टर अर्थात, दृष्टिकोन व विश्वास आपण जाणीवपूर्वक निर्माण करतो का? योग्यवेळी तो वापरतो का? हे बघणं ही तितकंच आवश्यक असतं हे यामध्ये दाखवले आहे.
सुनील हरिश्चंद्र हे या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे, रंगभूषा उदयराज तांगडी, संगीत निनाद म्हैसळकर, सूत्रधार दिनू पेडणेकर, व्यवस्थापन अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर, नेपथ्य संदेश बेंद्रे तर प्रकाश योजनेची जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
निखिल जाधव
मो. 9356454504
सदर नाटकाच्या प्रवेशिकांसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
राजेश कोळेकर
मो : 7774002023