26.2 C
New Delhi
Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रयेरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल

येरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल


पुणे, : पुणे मेट्रो उद्या दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पासून येरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेसाठी सुरु करीत आहे. उद्यापासून सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत प्रवासी सेवा सुरु असेल.
उद्यापासून हे स्थानक प्रवासी सेवेत दाखल झाल्यामुळे, वनाझ ते रामवाडी पर्यंतचा संपूर्ण विभाग (मार्गिका २) पूर्णपणे कार्यान्वित होईल. यामुळे येरवडा रहिवासी भाग उर्वरित मेट्रो नेटवर्कशी आणि पुणे शहराशी जोडला जाईल. यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, कर्मचारी वर्ग, येरवडा स्थानकाच्या जवळ असणाऱ्या आयटी हब मधील कर्मचारी आणि रहिवाशांच्या यांना लक्षणीय फायदा होणार आहे. प्रवासी संख्या वाढवणे आणि पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे यासाठी या स्थानकाच्या प्रवासी सेवेचा उपयोग होणार आहे.


या स्थानकाची बाह्यरचना वैशिष्टपूर्ण आहे. स्थानकाचा दर्शनी भाग ऐतिहासिक दांडी मार्चपासून प्रेरित आहे, जो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. हे स्थानक केवळ एक महत्त्वाचा वाहतूक दुवा म्हणून काम करणार नाही तर आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देणारे आहे.
याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना कार्यक्षम आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून येरवडा मेट्रो स्टेशन सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे”.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26.2 ° C
26.2 °
26.2 °
96 %
4.1kmh
99 %
Thu
33 °
Fri
35 °
Sat
35 °
Sun
34 °
Mon
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!