रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी होणार गौरव
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्यकिरण पुरस्कारासाठी कवयित्री सुप्रिया पुरोहित-हळबे यांची निवड करण्यात आली असून पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 25 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार असल्याची माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमास वर्षा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असून निरुपमा महाजन, मुक्ता भुजबले यांचा विशेष सहभाग असणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, प्राजक्ता वेदपाठक, वासंती वैद्य, नचिकेत जोशी, ऋचा कर्वे, स्वाती यादव, चैतन्य कुलकर्णी, योगेश काळे, उर्मिला वाणी, राजश्री सोले, स्वाती दाढे, स्वप्नील पोरे यांचा सहभाग असणार आहे, असे मैथिली आडकर आणि प्रज्ञा महाजन यांनी सांगितले. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : सुप्रिया पुरोहित-हळबे
प्रति,
मा. संपादक
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्यकिरण पुरस्कारासाठी कवयित्री सुप्रिया पुरोहित-हळबे यांची निवड करण्यात आली असून पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 25 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
ॲड. प्रमोद आडकर, अध्यक्ष, रंगत-संगत प्रतिष्ठान
भूषण कटककर, अध्यक्ष, करम प्रतिष्ठान
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 992297801
सुप्रिया पुरोहित-हळबे यांना काव्यकिरण पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES
New Delhi
scattered clouds
25
°
C
25
°
25
°
90 %
3.7kmh
33 %
Tue
35
°
Wed
36
°
Thu
36
°
Fri
31
°
Sat
28
°