24.9 C
New Delhi
Sunday, October 12, 2025
Homeमनोरंजनस्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार विदुषी देवकी पंडित यांना जाहीर

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार विदुषी देवकी पंडित यांना जाहीर

गानवर्धन, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे रविवारी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

पुणे : गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कारासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी आणि विदुषी किशोरी अमोणकर यांच्या शिष्या, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका विदुषी देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता एम्‌‍. इ. एस. बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण सुविख्यात शास्त्रज्ञ, पद्मभूषण विजय भटकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या 12 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.


पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर विदुषी देवकी पंडित यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली असून त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), रोहित मुजुमदार (तबला) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने आतापर्यंत पंडित व्यंकटेशकुमार, विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर, विदुषी डॉ. अलका मारुलकर, पंडित विनायक तोरवी, पंडित डॉ. विकास कशाळकर, पंडित आनंद भाटे, पंडित विजय कोपरकर, पंडित रघुनंद पणशीकर, विदुषी कलापिनी कोमकली, पंडित केशव गिंडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
24.9 ° C
24.9 °
24.9 °
48 %
1.1kmh
0 %
Sun
32 °
Mon
33 °
Tue
33 °
Wed
33 °
Thu
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!