30.7 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeमनोरंजनटॅबू'चे चित्रीकरण पूर्ण

टॅबू’चे चित्रीकरण पूर्ण

पुष्कर जोग - आनंद पंडित मोशन पिक्चर्स पुन्हा घेऊन येत आहेत एक जबरदस्त चित्रपट

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. ‘ती आणि ती’, ‘वेल डन बेबी’, ‘व्हिक्टोरिया’, ‘बापमाणूस’ आणि ‘मुसाफिरा’ असे नातेसंबंधांवर भाष्य करणारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर पुष्कर जोग आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स आपला नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांचा हा सहावा एकत्रित चित्रपट असून या चित्रपटाची खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. ‘टॅबू’च्या निमित्ताने पुष्कर जोग आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी पडद्यावर एकत्र झळकणार असून पूर्वी मुंदडा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, किशोरी अंबिये, विजय पाटकर पृथ्वीक प्रताप आणि अनुष्का सरकटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोग लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे योगेश महादेव कोळी डीओपी आहेत.

या चित्रपटाबद्दल पुष्कर जोग म्हणतात, ” आनंद पंडित यांच्यासोबत मी हा सहावा चित्रपट करत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कायमच कमाल असतो. ते नेहमीच चांगल्या चित्रपटांना, कलाकारांना प्रोत्साहन देतात. मुळात आमच्या दोघांमध्ये एक बॉण्डिंग तयार झाले आहे. ज्यामुळे आम्हाला एकमेकांकडून काय अपेक्षित आहे, हे कळते आणि त्यामुळेच आम्ही उत्तम कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ शकतो. प्रेक्षकांना काहीतरी उत्तमोत्तम देण्याचा आमचा कायमच प्रयत्न असतो. मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आम्हा दोघांचा मानस असून ‘टॅबू’च्या निमित्ताने पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
30.7 ° C
30.7 °
30.7 °
65 %
2.6kmh
37 %
Sun
34 °
Mon
35 °
Tue
37 °
Wed
32 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!