32.8 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्रमुस्लिम कलाकारांनी साकारला हसबनीस बखळ मंडळाचा 'गजमहल'

मुस्लिम कलाकारांनी साकारला हसबनीस बखळ मंडळाचा ‘गजमहल’


स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र असलेले शनिवार पेठेतील हसबनीस बखळ गणेशोत्सव मंडळाचे १३१ वे वर्ष ; अभिनव महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सलमान शेख आणि कलाकार

पुणे : लोकमान्य टिळकांनी बसविलेला सातवा गणपती अशी ओळख असलेले शनिवार पेठेतील हसबनीस बखळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा १३१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मंडळ यंदा भव्य गजमहल साकारणार असून या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम कलाकार सलमान शेख हे गणरायाचा ‘गजमहल’ साकारत आहेत.

गजमहल देखावा ४० बाय २० रुंद आणि उंच २० फुट उंच आहे. सलमान शेख सध्या आंबेगाव येथे देखाव्याचे काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव महाविद्यालयाचे १५ विद्यार्थी सजावटीचे काम करत आहेत. मागील चार वर्षापासून शेख हे मंडळाचे सजावटीचे काम करीत असून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अभिनव महाविद्यालयात शिक्षण घेऊन व्यवसाय उभा केला आहे.

रणजीत ढगे पाटील हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या प्रेरणेने स्थापन झालेले मंडळ ही हसबनीस बखळ मंडळाची विशेष ओळख आहे. हे मंडळ स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी लोकांनी एकत्र येण्याचे शनिवार पेठेतील महत्त्वाचे केंद्र होते. मामासाहेब हसबनीस यांच्या पुढाकाराने सन १८९४ मध्ये लक्ष्मणराव जावळे व लोकमान्य टिळक यांच्या हस्ते मंडळाची स्थापना झाली.

रणजीत ढगे पाटील म्हणाले, गणेशोत्सव हा समाजातील सगळ्यांचा उत्सव आहे. उत्सवात मुस्लिम गणेशभक्त देखील उत्साहात सहभागी होऊन त्यांची सेवा देतात. लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला. तीच विचारसरणी अनुसरत मंडळ पुण्याच्या गणेशोत्सवात आपली वेगळी ओळख जपत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
32.8 ° C
32.8 °
32.8 °
61 %
3.8kmh
26 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!