27.6 C
New Delhi
Wednesday, July 16, 2025
Homeक्रीड़ामनू भाकरपासून स्‍वप्‍नील कुसालेपर्यंत भारतीय अॅथलीट्सनी सुरू केले व्‍हॉट्सअॅप चॅनल्‍स आणि थ्रेड्स

मनू भाकरपासून स्‍वप्‍नील कुसालेपर्यंत भारतीय अॅथलीट्सनी सुरू केले व्‍हॉट्सअॅप चॅनल्‍स आणि थ्रेड्स

पुणे : विक्रम मोडून काढण्‍यापासून पदक जिंकण्‍यापर्यंत भारतीय अॅथलीट्स जागतिक स्‍तरावर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करत आहेत. आपले चॅम्पियन अॅथीलीट्स अमन सेहरावत मनू भाकर, निशाद कुमार, सुमित अंतिल आणि स्‍वप्‍नील कुसाले यांनी व्‍हॉट्सअॅप चॅनल्‍स सुरू केले आहेत, तसेच बहुतेकजण आता थ्रेड्सवर देखील आहेत. चाहत्‍यांसोबतच्‍या सहभागाला नव्‍या उंचीवर घेऊन जात हे अॅथलीट्स या नवीन माध्‍यमांद्वारे विशेष कन्‍टेन्‍ट, पडद्यामागील गोष्‍टी आणि प्रशिक्षण नित्‍यक्रमांबाबत माहिती शेअर करतील.

इन्‍स्‍टाग्राम व फेसबुकप्रमाणे व्‍हॉट्सअॅप चॅनेल्‍स आणि थ्रेड्स क्रिएटर्स व व्‍यक्‍तींसाठी चाहत्‍यांसोबत घट्ट संबंध निर्माण करण्‍यासाठी प्‍लॅटफॉर्म्‍स आहेत. नुकतेच समाप्‍त झालेल्‍या ऑलिम्पिक गेम्‍ससह अॅथलीट्सनी नवे यश संपादित करताना दिसण्‍यात आलेल्‍या पॅरालिम्पिक गेम्सप्रती फॅन्‍डम पाहता चाहते अॅथलीट्ससोबत उत्तम संबंध स्‍थापित करण्‍यास उत्‍सुक आहेत. निपुण नेमबाज व दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्‍या मनू भाकर म्हणाल्‍या, ”मला चाहत्‍यांकडून मिळालेले प्रेम व पाठिंबा अत्‍यंत हृदयस्‍पर्शी आहे. मला या समुदायासोबत दृढ नाते निर्माण करायचे आहे आणि त्‍यांना माझ्या प्रवासाबाबत अनुभव द्यायचा आहे. माझ्या व्‍हॉट्सअॅप चॅनलसह ही बाब शक्‍य करण्‍याची ही अद्भुत संधी आहे. मी माझ्या प्रवासाचा भाग असलेल्‍या आणि भाग होण्‍याची इच्‍छा असलेल्‍या चाहत्‍यांसोबत संलग्‍न होण्‍यास उत्‍सुक आहे.”

मेटा इंडियाच्‍या ग्‍लोबल पार्टनरशिप्‍सचे संचालक पारस शर्मा म्‍हणाले, ”आम्‍हाला आनंद होत आहे की, आमचे प्‍लॅटफॉर्म्‍स चॅम्पियन भारतीय अॅथलीट्ससाठी आश्रयस्‍थान बनले आहेत, जेथे ते त्‍यांच्‍या चाहत्‍यांसोबत चर्चा करू शकतात आणि रिअल-टाइम अपडेट्स शेअर करू शकतात. आमचा अॅथलीट्स व क्रिएटर्सना स्‍वत:ला वास्‍तविकतपणे अभिव्‍यक्‍त करण्‍यास सक्षम करण्‍यावर विश्‍वास आहे, ज्‍यामुळे ते त्‍यांच्‍या फॉलोअर्ससोबत प्रबळ सामुदायिक भावना जागृत करू शकतात.
अॅथलीट्सचे व्‍हॉट्सअॅप चॅनल्‍स व थ्रेड्स अकाऊंट्स पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा:
● व्‍हॉट्सअॅप चॅनल्‍स: Aman Sehrawat, Manu Bhaker, Nishad Kumar, Sumit Antil आणि Swapnil Kusale.
● थ्रेड्स: Aman Sehrawat, Nishad Kumar, Sumit Antil आणि Swapnil Kusale.
जागतिक स्‍तरावर, आंतरराष्‍ट्रीय क्रीडा खेळाडू त्‍यांच्‍या चाहत्‍यांसोबत संलग्‍न होण्‍यासाठी थ्रेड्सचा वापर करताना दिसले आहेत, जसे Katie Ledecky (११७ हजार फॉलोअर्स), Tatyana Mc Fadden (७.७ हजार फॉलोअर्स), Markus Rehm (१.८ हजार फॉलोअर्स), Francis Ngannou (९४२ हजार फॉलोअर्स) आणि Oksana Masters🇺sua (८.५ हजार फॉलोअर्स), Ronaldinho Gaúcho (८.४ दशलक्ष फॉलोअर्स).

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.6 ° C
27.6 °
27.6 °
75 %
3.7kmh
100 %
Wed
35 °
Thu
32 °
Fri
35 °
Sat
36 °
Sun
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!