पुणे ः भारतात प्रथमच लाइटिंग टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटमध्ये इंडस्ट्री ओरिएंटेड टेक्निकल मॅनेजरियल पीजी प्रोग्रॅम सुरू केल्या बद्दल इंडियन सोसायटी ऑफ लाइटिंग इंजिनिअर्स (आयएसएलई), पुणे लोकल सेंटर यांच्या वतीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘विश्वशांती प्रकाश दीप पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले.
कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या परिसरात इंडियन सोसायटी ऑफ लाइटिंग इंजिनिअर्स (आयएसएलई), पुणे लोकल सेंटर आणि महा मेट्रो यांच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय ‘प्रकाश २०२४’ या कार्यक्रमात डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार ने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी व्हॉसकॉमचे सीएमडी वासुदेवन, पुणे मेट्रोचे संचालक विनोद अग्रवाल, अतुल गाडगीळ, प्रकाश बडजात्ये, जयंत इनामदार, हर्षा जोशी आणि विरेन्द्र बोराडे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “जगाला योग्य प्रकाश देण्यासाठी शांती ही अत्यंत महत्वाची आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘सत् चित् आंनद’ या दोन गोष्टींनी सृष्टीवरील प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि सुखी राहु शकतो. वर्तमान काळात विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय महत्वाचा आहे. स्वामी विवेकानंद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारत विश्वगुरू होईल व ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल.”
व्हॉसकॉमचे सीएमडी वासुदेवन म्हणाले,”प्रकाश हे आपले शहरी जीवनमान आकारण्याचे महत्वपूर्ण साधन आहे. या मुळे नागरिक जीवन प्रभावित होते. नवीनतम प्रकाश तंत्रज्ञान शहरांच्या अधोसंरचनेला कसे परिवर्तीत करू शकतात हे महत्वाचे आहे. नागरिकांच्या सहभागातून ऊर्जा कार्यक्षम आणि सुरक्षित सार्वजनिक क्षेत्रे कशी निर्माण केली जाऊ शकतात यावर लक्ष देणे गरजेचे आहे.”
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी स्वागत पर भाषण केले.
डॉ.विश्वनाथ कराड ‘विश्वशांती प्रकाश दीप पुरस्कार’ ने सन्मानीत
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
91 %
4.5kmh
100 %
Tue
34
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
29
°
Sat
27
°