36.2 C
New Delhi
Saturday, June 7, 2025
Homeदेश-विदेशजानेवारी महिन्यात साजरा होणार 'आर्मी डे'

जानेवारी महिन्यात साजरा होणार ‘आर्मी डे’

लष्कराचा गौरवशाली इतिहास उलगडणार

भारतीय लष्कराचा स्थापना दिवस साजरा करण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यात १५ जानेवारी २०२५ रोजी आर्मी डे समारंभ आयोजित केला जाणार आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे या समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. या सोहळ्याच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या माध्यमातून लष्कराचा गौरवशाली इतिहास उलगडणार आहे. या पूर्वी हा सोहळा फक्त दिल्लीत आयोजित करण्यात येत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा सोहळा दिल्ली बाहेर होत असून पुढील वर्षी पुण्यात हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्कराची स्थापना ही १५ जानेवारी १९४९ रोजी झाली होती. या दिवशी फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून १५ जानेवारीला  आर्मी डे साजरा केला जातो. १९४९ मध्ये ब्रिटीश जनरल सर रॉय बुचर यांच्यानंतर करीअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली. त्याच वर्षी आर्मी डे साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

आर्मी डे पुण्यात कोठे होणार या साठी दक्षिण मुख्यालयाचे अधिकारी चाचपणी करत आहेत. पुण्यातील नेमके ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र, आर्मी डे परेड ही खडकी येथील बॉम्बे सॅपर्स (बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटर) येथे होऊ शकते. या बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
36.2 ° C
36.2 °
36.2 °
29 %
1.2kmh
0 %
Sat
36 °
Sun
46 °
Mon
46 °
Tue
45 °
Wed
45 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!