पुणे : जागतिक हृदय दिनानिमित्त पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलतर्फे पेडल फॉर हार्ट ह्या विशेष सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ सप्टेंबर, शनिवारी सकाळी ५:३० वाजल्यापासून ही सायक्लोथॉन सुरू होणार आहे. सदरील सायक्लोथॉन हि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल परिसरातून सुरू होईल. ‘पेडल फॉर हार्ट ’ ही १५किमीची सायक्लोथॉन आहे जी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलपासून निगडी प्राधिकरणपर्यंत जाईल. या कार्यक्रमाचा उद्देश हृदयाचे आरोग्य आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आहे.
या सायक्लोथॉनमध्ये थरारक सायकलिंग सत्रे, उर्जायुक्त झुंबा वर्कआउट्स, सर्व वयोगटांसाठी भरपूर मजेदार उपक्रम घेण्यात येतील. तुम्ही सायकलिंगचे प्रेमी असाल किंवा सक्रिय राहण्यासाठी एक वेगळा आणि उत्साही मार्ग शोधत असाल, #पेडलफॉरहार्ट तुमच्यासाठी परिपूर्ण आहे! चला, हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देऊया आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची शपथ घेऊया.जागतिक हृदय दिन हा २९ सप्टेंबरला साजरा केला जातो, जो आपल्या हृदयाच्या आरोग्याची आठवण करून देणारा दिवस आहे. हृदयरोग हा जागतिक स्तरावरील प्रमुख मृत्यूचे कारण आहे, त्यामुळे हा दिवस लोकांना निरोगी सवयी नियमित व्यायाम, संतुलित आहार, आणि आरोग्य तपासणी.स्वीकारण्यासाठी प्रेरित करतो
१५ किमीच्या ‘’पेडल फॉर हार्ट’ सायक्लोथॉनमध्ये भाग घेण्यासाठी त्वरित नोंदणी करा! कृपया दिलेल्या क्यूआर कोडवर स्कॅन करा आणि तुमची जागा निश्चित करा.