पुणे_ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात व्यवसाय अभ्यासक्रमच्यावतीने वाहतूक सुरक्षा या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर.टी.ओ.रेश्मा शेख उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.
आर.टी.ओ.रेश्मा शेख यांनी वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करावे, गाडीचा विमा काढलेला असावा, वेगावर नियंत्रण ठेवावे असे सांगितले.
प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी रस्ता सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असून छोट्या छोट्या चुकांमुळे मोठे अपघात घडतात. रस्ते अपघातात होणाऱ्या जीवितहाणीचे प्रमाण खूप मोठे असल्याचे सांगितले.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रा.अनिल जगताप, प्रा. डी. बी. देशमुख, प्रा. स्नेहल वाघमारे, प्रा.लता जराड, प्रा. नलिनी म्हेत्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल वाघमारे यांनी केले तर आभार प्रा. डी. बी. देशमुख यांनी मानले.