38.3 C
New Delhi
Sunday, May 4, 2025
HomeBlogश्री विठु रायाचे दर्शन होणार सुलभ

श्री विठु रायाचे दर्शन होणार सुलभ

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन मंडप आणि दर्शन रांग करण्यासाठी शासनाकडून 129.49 कोटीच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता.


*शासन निर्णय जारी, 13 कोटीचा निधी वितरित करण्यास ही शासनाची मान्यता.
*अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या दर्शन मंडप आणि दर्शन रांगेसाठी शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नांना यश, भाविकांना विठ्ठलाचे दर्शन होणार सुलभ

पंढरपूर :- महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटन विकसित करुन त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्याकरीता आणि स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करण्यास मोठा वाव असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन तसेच महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल- रुख्मिणी मंदिर,vithal rukamini पंढरपूर येथे यात्रा कालावधी दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात उभा करण्यात येणारा दर्शनमंडप आणि दर्शनरांग याकरीता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांनी येथील दि.16 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्तावास मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखालील दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. त्यानुषंगाने श्री विठ्ठल- रुख्मिणी मंदिर, पंढरपूर येथे कायमस्वरुपी दर्शनमंडप आणि दर्शनरांग darshanrang करणेकरीता शासन निर्णय नुसार 129.49 कोटी रकमेच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता तर 13 कोटी इतका निधी वितरीत करण्यासही यात मान्यता देण्यात आलेली आहे.
प्रकल्पात नमुद अंदाजपत्रकातील कामाच्या बाबी व त्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे.
दर्शन मंडप – मुलभूत सुविधा व इलेक्ट्रिकल वर्क सहित 87 कोटी 31 लाख तर दर्शन रांग (स्कायवॉक) सर्व सुविधायुक्त व इलेक्ट्रिकल वर्क सहित 42 कोटी 18 लाख इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून या कामाकरता 13 कोटीचा निधी सन 2024 25 या वर्षात वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे.
*जिल्हाधिकारी यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश-
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दर्शन मंडप व स्काय वॉकचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी अत्यंत नियोजनबद्धरित्या हा आराखडा तयार केला. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी हा आराखडा प्रथम पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मंजूर करून घेतला. त्यानंतर 17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत हा आराखडा प्राथमिक दृष्ट्या मंजूर झालेला होता, त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी या समितीने या आराखड्यास मंजुरी दिली. व 24 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आराखड्याला अंतिम मंजुरी दिलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला दर्शन मंडप व दर्शन रांगेचा प्रश्न आता लवकरच सुटणार असून यामुळे महाराष्ट्र राज्य सह देशभरातील विठ्ठल भक्तांना श्री विठ्ठलाचे दर्शन सहज व सुलभ होणार आहे.
*दर्शन म्हणतात देण्यात येणाऱ्या विविध सुविधा-
प्रस्तावित दर्शन मंडपमध्ये पिण्याच्या पाण्याचे सुविधा, शौचालय, लिफ्ट सुविधा, वैद्यकीय सुविधा, अल्पोपहार आपत्कालीन मार्ग प्रसाद व सुरक्षा व्यवस्था हिरकणी कक्ष व दिव्यांग सुविधा अत्यावश्यक वाहन व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत.प्रशस्त दर्शन मंडप असल्याने भाविकांना सुरक्षित सुसह्य सुविधायुक्त दर्शनाची सोय होणार आहे. स्काय वॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा कोणताही त्रास होणार नाही. तसेच भाविकांचा दर्शनाचा कालावधी कमी करणे शक्य होईल. तसेच भाविकांना अन्नछत्राच्या माध्यमातून विनामूल्य जेवणाची सुविधा पुरवली जाणार आहे.भाविकांना कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन टोकन यंत्रणा उभारण्यात येईल ज्यामुळे भाविकांना कमी वेळेत दर्शन करता येईल. याशिवाय प्रस्तावित प्रकल्पात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक तसेच स्तनदा मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
श्रींच्या दर्शनरांगेत कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकाम करणेकामी आराखडा तयार करून मंदिर समितीने सन 2018 मध्ये सभेत ठराव पारीत केला होता. या दर्शन हॉल व स्कायवॉकचे संपूर्ण व्यवस्थापन, टोकन दर्शन व्यवस्था, देखभाल दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था, अन्नछत्र, स्वच्छता व इतर अनुषंगिक सर्व सोयी सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे. या आराखड्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दर्शनार्थी भाविकांना जलद व सुलभ दर्शन होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
38.3 ° C
38.3 °
38.3 °
20 %
1.5kmh
84 %
Sun
38 °
Mon
36 °
Tue
38 °
Wed
40 °
Thu
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!