मुंबई- महाराष्ट्र विधानसभेचे पडघम कधीही वाजू शकतात. महायुती सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक आज पडली. त्यामुळे येत्या २४ तासात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली असून जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्नसुरू केला आहे. लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक ठरली असून महायुतीने शेवटच्या टप्प्यात अनेक लोकप्रिय घोषणांचा धडका लावून जनतेला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. याला काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रासाठी जाहीरनामा बनवण्याचं काम सुरू असून या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, तरुणांसोबत सर्वसामान्य जनतेला आकर्षित करणाऱ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक सुरु आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख ६ नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड दिल्लीतील बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत जाहीरनाम्यावर चर्चा होणार आहे.
महायुतीच्या ‘लाडकी बहिणी’ला ‘महालक्ष्मी’ने उत्तर
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
30.6
°
C
30.6
°
30.6
°
28 %
3.2kmh
0 %
Fri
30
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°