नवी दिल्ली -राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही जबाबदारी पार पडली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. 1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.