वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडे नगर, दळवी नगरमधील ग्रामस्थांच्या गाठीभेटीद्वारे घेतले आशीर्वाद
“निश्चिंत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत” ग्रामस्थांनी दिला जगतापांना शब्द
गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांची विशेष उपस्थिती
ग्रामस्थांसह, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जगताप यांचे जोरदार स्वागत
चिंचवड : – चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडे नगर गावभेट दौऱ्यास स्थानिक ग्रामस्थ, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी गुजरात राज्याचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांची विशेष उपस्थिती होती.या गावभेट दौऱ्यानिमित्त शंकर जगताप यांनी वाल्हेकरवाडी, बिजली नगर आणि चिंचवडे नगर परिसरातील मान्यवर मंडळींच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. यामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, माजी सत्तारूढ पक्षनेते शामराव वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, माजी नगरसेवक माऊली सूर्यवंशी, शेखर चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी, आबा सोनवणे, रवींद्र वाल्हेकर, निखिल वाल्हेकर, अशोक शिवले, अनिल चिंचवडे, बाबाजी चिंचवडे, सागर चिंचवडे, अशोक भालके, आनंदा चिंचवडे, अशोक वाल्हेकर, पोपट शिवले, दिलीप साठे या ग्रामस्थांच्या निवासस्थानी जगताप यांनी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली.ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी फटाक्यांच्या माळा फोडून आणि औक्षण करून शंकर जगताप यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जगताप यांनी ज्येष्ठांचे आशिर्वाद घेतले. यावेळी “तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपला विजय विक्रमी मताधिक्यानेच होणार, असा शब्द यावेळी तिन्ही गावातील ग्रामस्थांनी जगताप यांना दिला.या गावभेट दौऱ्याप्रसंगी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, शहर उपाध्यक्ष सुधीर वाल्हेकर, माजी स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, कविता दळवी, पल्लवी वाल्हेकर, पल्लवी मारकड, सुधीर चिंचवडे, मनोज तोरडमल, युवराज वाल्हेकर, निखिल वाल्हेकर, सोमनाथ वाल्हेकर, शैलेश वाल्हेकर, वाल्मिक शिवले, सचिन शिवले, गौरव शिवले, संदीप शिवले, रेणुका आनंदपुरे, अनिकेत दळवी, प्रदीप पटेल, भगवान निकम, बिरमल चौबे, शिवाजी आवारे, कीर्ती परदेशी यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.