चिंचवड : :- श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवड पुण्यभूमीचे नेतृत्व करण्याची संधी चिंचवडकरांनी आम्हाला दिली. तुमच्या सर्वांच्या साथीने आम्ही आपल्या चिंचवड विधानसभेचा विकासाचा वारसा जोपासला. यापुढे हाच वसा निरंतर आणि अविरत सुरु राहावा यासाठी चिंचवड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन, आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवडकरांना केले.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आता आमदार अश्विनी जगताप मैदानात उतरल्या आहेत. प्रभाग निहाय भेटी-गाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राजकीय खलबत सुरू होती. मात्र, आमदार अश्विनी जगताप यांनीच पक्षश्रेष्ठींकडे शंकर जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस केली. त्यामुळे भाजपाच्या पहिल्या यादीतच शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
दरम्यान, आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवड मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली आहे. चिंचवडमधील भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि भाजपा परिवारातील सहकाऱ्यांच्या मदतीने भेटी-गाठी आणि संवाद कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
या संवाद कार्यक्रमात बोलताना जगताप म्हणाल्या की, चिंचवडच्या मतदारांनी स्व. लक्ष्मण जगताप असतील किंवा मी असेल नेहमीच आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला खंबीरपणे साथ दिली आहे. आम्हीही कायम आमच्या कामाच्या माध्यमातून तुमचा विश्वास जपण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यापुढेही विश्वास जपणार आहे. त्यासाठी आपण यावेळीही आमच्यावरील विश्वास दृढ करून शंकर जगताप यांना माझ्यापेक्षाही जास्त मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
चिंचवडगावात शंकर जगताप यांची प्रचारात आघाडी
महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची निश्चिती झालेली नाही. मात्र, चिंचवडमध्ये सध्या शंकर जगताप यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसत आहे. शंकर जगताप यांनी उमेदवारी जाहीर होताच नवी सांगवी परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी आणि बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जगताप यांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन नागरिकांचा आशीर्वाद घेतला. ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी औक्षण करून तर नागरिकांनी फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘अब की बार, शंकरभाऊ आमदार’ अशा घोषणा देत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वास, यावेळी जगताप यांना दिला.