पिंपरी- भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवड विधानसभेची उमेदवारी मिळाली त्यांनी व त्यांच्या संपुर्ण टीमने चिंचवड विधानसभा निवडूण आणण्याकरिता संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे त्यामुळे तिन्ही विधानसभेत संघटनात्मक रचना लावणे आता वेळे अभावी लक्ष देणे शक्य नव्हते व तसे त्यांनी प्रदेशाला कळवले होते.
खरं तरं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे सर्व नेते दिवंगत आ.लक्ष्मण जगताप, आ.महेश लांडगे, शंकर जगताप यांसोबतच गावकी-भावकीचा मोठा प्रभाव असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात एका नव्या दमाच्या स्थानिक चेहऱ्याच्या शोधात होती.शत्रुघ्न काटे हे आपल्या विद्यार्थीदशेपासून विद्यार्थी चळवळीत आहेत शिवाय गेल्या वीस बावीस वर्षांपासून विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजकारणात आहेत.शत्रुघ्न काटे हे स्थानिक भूमिपुत्र असून ते यशस्वी बांधकाम आणि हॅाटेल व्यावसायिक आहेत.सामाजिक काम, नम्र स्वभाव व सुसंस्कृत उच्च शिक्षित चेहरा यामुळे साधारण तीन टर्म पिंपळे सौदागर सारख्या उच्चभ्रू भागातून भरघोस मतांनी निवडूण येणारे नगरसेवक आहेत.हिंदुत्ववादी विचारधारा आणि मोदीजी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन त्यांनी 2014 मधे पक्षात प्रवेश केला आणि गेल्या दहा वर्षांपासून ते पक्ष विस्ताराकरिता संघटनेचे उत्तमरित्या त्यांनी काम केले आहे.केवळ चिंचवडच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक भूमिपुत्रांवर देखिल त्यांचा सकरात्मक प्रभाव आहे.पिंपरी चिंचवड शहराला एक सांस्कृतिक, उच्च शिक्षित व सर्वांना आवडेल, समन्वय करेल अशा नव्या दमाच्या स्थानिक चेहऱ्याची आवश्यकता व आत्ताची चिंचवड विधानसभा निवडणूक व अगामी महानगरपालिका निवडणूकांचा विचार करता शत्रुघ्न काटे सारख्या ताकदवान आणि नम्र कार्यकर्त्याला ताकद दिली पाहीजे असे लक्षात आल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शत्रुघ्न काटे यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांना केली.माजी शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे माजी खासदार अमर साबळे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे व शहरातील सर्व प्रमुख नेत्यांशी फोन वर चर्चा करून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शत्रुघ्न काटे यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली.केवळ चिंचवड विधानसभा नाही तर पिंपरी व भोसरी विधानसभेतही त्यांचा जनसंपर्क व स्वच्छ प्रतिमा आणि नात्या-गोत्याचे जाळे या सर्वाचाच पक्षाला चांगला फायदा होईल अशी चर्चा सर्व पिंपरी चिंचवड शहरात होती.
जेष्ठ नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे यांची भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी निवड
RELATED ARTICLES
New Delhi
haze
35.1
°
C
35.1
°
35.1
°
49 %
4.6kmh
40 %
Fri
35
°
Sat
38
°
Sun
38
°
Mon
38
°
Tue
37
°