21.1 C
New Delhi
Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यादीपावली २०२४ निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

दीपावली २०२४ निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

पंढरपूर- वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. या निमित्त दुपारी पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे वसुबारस पासून ते दिवाळी पाडवा पर्यन्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री विठ्ठलास सोने पगडी, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड मोठा, हिऱ्याचे कंगन जोड, शिरपेच लहान, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी पेठांचा मोत्यांचा हार, मत्स्य जोड, तोडे जोड, तुळशीची माळ एक पदरी, बाजीराव कंठी इ. व श्री रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.

तसेच दिपावलीत वसुबारस, दिवाळी पाडवा, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, श्री. ज्ञानेश्वर दर्शन मंडप व भक्त निवास इत्यादि ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण विठ्ठल मंदिर आणि मंदिर परिसरात मोठ्या संख्येने पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
21.1 ° C
21.1 °
21.1 °
46 %
2.1kmh
0 %
Thu
27 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
30 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!