20.1 C
New Delhi
Wednesday, November 5, 2025
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीची याला पाडा,त्याला गाडा ही कुठली संस्कृती : भाजपा नेत्या पंकजा...

महाविकास आघाडीची याला पाडा,त्याला गाडा ही कुठली संस्कृती : भाजपा नेत्या पंकजा मुंडे

महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारात तोफ डागली

महाविकास आघाडीकडे बोलायला मुद्दाच नाही म्हणून आरोप
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी गेल्या १० वर्षांत समाविष्ट गावांमध्ये अनेक कामे करून दाखवली आहेत. ही कामं केल्यानंतरही केवळ विरोधाला विरोध आणि राजकारणात टिकायचे म्हणून टीका करायची. “याला पाडा त्याला गाडा ही कुठली संस्कृती? असा सवाल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.

‘‘अरे जो काम करतो त्याला निवडून आणण्याचा सर्वस्वी अधिकार नागरिकांचा आहे”. काम करणाऱ्या माणसाला राजकारणात टिकून ठेवण्याची जबाबदारी जनतेची नाही का? असे सवालही त्यांनी यावेळी नागरिकांना उद्देशून केला.

महायुतीच्या भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की  या सभेला येण्यापूर्वी मी या मतदारसंघाची माहिती घेत होते. माहिती घेत असताना सध्या विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची माहिती मिळाली. मात्र महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या समाविष्ट गावांमध्ये केलेले काम मी पाहिले आहे.
**

महेशदादाची हॅट्रिक निश्चित…

संविधान भवन, न्यायालय संकुल, संतपीठ यांसारखी कामे करून नागरिकांच्या हृदयात महेश लांडगे यांनी स्थान मिळवले आहे. कार्यकर्त्यांनी नागरिकांना या कामाची आठवण करून देणे गरजेचे आहे. सद्या महाविकास आघाडीकडे बोलायला मुदत नाही. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची निवडणुकीतील जुमलेबाजी सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाचा संकल्प राहिलेला नाही. राजकारणात हा सूर्य आणि हा जयद्रथ असेच काम दाखवावे लागते जे काम महेश लांडगे यांनी केलेले आहे. या विकासाच्या कामावरच यंदा त्यांची हॅट्रिक निश्चित आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
**

आंब्याच्या झाडाला दगडे मारले जातात…
कुणीही कडुलिंब, बाभळीला नाही तर आंब्याच्याच झाडाला दगडे मारतात. पैलवानाने व्यथित होऊन नाही तर बलवान होऊन राजकारण करायचे आहे. बल बुद्धी आणि विद्या हे सर्व काही एका पैलवानाकडेच असते. असा गैरसमज आहे की पैलवानाला फक्त भावना कळतात नव्हे, तर पैलवान कोणत्या वेळेला शरीराचा कोणता स्नायू वापरून शत्रूला चिटपट करायचे हे ठरवत असतो. म्हणून आमदार महेश लांडगे यांनी राजकीय पैलवान होऊन टीकेला उत्तर न देता केलेले काम दाखवत आहेत. त्यामुळे विरोधक चितपट झाल्याशिवाय राहणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
**

गेल्या 75 वर्षात आपल्या माय माऊलींसाठी शौचालय बांधण्याचे यांना सुचले नाही. राज्यातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी दर महिन्याला ओवाळणी देणारे महायुतीचे सरकार आहे त्यामुळे महायुती सरकारचे हात बळकट करण्यासाठी भोसरी विधानसभेतून आमदार महेश लांडगे यांच्यासह प्रत्येक विधानसभेतील उमेदवार निवडून देणे ही आता लाडक्या बहिणींची जबाबदारी आहे.
– पंकजा मुंडे, आमदार, भाजपा नेत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
88 %
1.5kmh
75 %
Wed
31 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!