थेरगाव – चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सेक्टर ऑफिसर्स यांनी आपसांत योग्य समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी दिले.विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर ऑफिसर्सचे प्रशिक्षण थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) स्मृती कामगार भवन येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार , पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, सेक्टर ऑफिसर समन्वयक अजिंक्य येळे यांच्यासह सेक्टर ऑफिसर तसेच संबंधित कक्षाचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी प्रशिक्षणास उपस्थित सेक्टर ऑफिसर्सना मार्गदर्शन केले. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर गर्दीचे योग्य नियोजन करावे, पार्किगच्या सुविधेचा आढावा घ्यावा, मतदान केंद्राच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी तसेच मतदारांसाठी त्या ठिकाणी असणाऱ्या मुलभूत सुविधा आदीबाबत आढावा घ्यावा तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व शांत वातावरणात पाडण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत योग्य समन्वय ठेवावा आदी सूचना यावेळी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी दिल्या.
निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व यशस्वीपणे पार पाडावी-मनवेश सिंग सिद्धू
RELATED ARTICLES
New Delhi
haze
20.1
°
C
20.1
°
20.1
°
60 %
1.5kmh
0 %
Tue
25
°
Wed
27
°
Thu
26
°
Fri
26
°
Sat
26
°