पिंपरी- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील दक्षिण भारतीय मतदार पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शीलवंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास कर्नाटक राज्याचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी व्यक्त केला आहे.पिं.चिं.शहर काँग्रेस दक्षिण भारतीय सेलने प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी जॉर्ज बोलत होते. यावेळी पिं.चिं.शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम, डीसीसी दक्षिण भारतीय अध्यक्ष लक्ष्मी नायर, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाबू नायर, कामगार नेते राजन नायर, रवी एन.पी., . करीम पुना, व्ही.एम.कबीर, हाजरा कबीर, साहूल उर्फ हमीद शेख, जॉर्ज मॅथ्यू, सजी वर्की व कार्यकर्ते उपस्थित होते.कर्नाटक राज्याचे ऊर्जा मंत्री मा. के. जे. जॉर्ज यांनी डॉ. सुलक्षणा शिलंवत यांचे कौतुक करताना म्हणाले की प्रशासनामध्ये आपल्यासारख्या ऊर्जेने भरलेल्या,व्हिजन असलेल्या, कार्यमग्न, कार्यतत्पर अशा व्यक्तींची आवश्यकता आहे.जागरूक मतदार नक्कीच तुम्हाला निवडून आणतील यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. निवडणुकीनंतर शुभेच्छा देण्यासाठी पुन्हा एकदा शहरात येणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.यावेळी बोलताना डॉ. सुलक्षणा शिलंवत म्हणाल्या की, दक्षिण भारतीय समाजाचे शहरासाठी आजवर खूप मोठे योगदान राहिले आहे,हा समाज नेहमीच शहराच्या सामाजिक, राजकीय घडामोडींमध्ये, वेगवेगळ्या विकास कामांमध्ये अग्रेसर राहिला आहे.शहरातील मोठ मोठे व्यावसायिक हे दक्षिण भारतीय आहेत. आणि असा समाजाबद्दल जागृत असलेला समाज माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे मी माझे भाग्य समजते.शिलंवत यांनी कर्नाटक राज्याचे ऊर्जा मंत्री मा. के. जे. जॉर्ज यांचे आभार मानले,पिं.चिं.शहर काँग्रेस दक्षिण भारतीय सेल, तसेच पिं.चिं.शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम यांचे देखील आभार मानत शहराच्या विकासासाठी आपण सगळे कटिबध्द आहोत आणि शहराचा चौफेर विकास साधण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊन विजयाचा गुलाल उधळू असा विश्वास दिला.
दक्षिण भारतीय समाज खंबीरपणे डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी
कर्नाटक राज्याचे ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी केले डॉ.सुलक्षणा शिलवंत यांचे कौतुक
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
29.7
°
C
29.7
°
29.7
°
32 %
2.6kmh
0 %
Fri
31
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°