पिंपरी, महाराष्ट्राचा विकास प्रगती व उज्वल भविष्यासाठी महायुतीला मतदान करा. घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून पिंपरी विधानसभा मतदार संघातून कार्यक्षम आमदार अण्णा बनसोडे यांना पुन्हा एकदा विजयी करा असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती चे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांची संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर मध्ये गुरुवारी सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी रूपाली चाकणकर बोलत होत्या. प्रचारफेरीची
सुरवात तुळजाभवानी मंदिर, पोटे कॉर्नर जवळ संभाजी नगर येथून झाली. पुढेसुबोध विद्यालय, रसरंग स्वीटस, अटल बिहारी वाजपेयी उद्यान, अष्टविनायक गणपती मंदिर, शाहू नगर संपूर्ण भाग, धम्मचक्र बुद्ध विहार, कमलनयन बजाज स्कुल, सोमेश्वर मंदिर, कस्तुरी मार्केट, अजंठा नगर, आंबेडकर कॉलनी अशी ही प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी आमदार अण्णा बनसोडे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आण्णा बनसोडे यांनी बाल दिनानिमित्त बालगोपाळांना शुभेच्छा दिल्या. तर अनेक पालकांनी अण्णांसोबत आपल्या चिमुकल्यांचे फोटो काढले.या प्रचार फेरीत आमदार अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्ष कविता आल्हाट माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, केशव घोळवे ,अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे तसेच कुशाग्र कदम, कल्पेश हरणे, गणेश शर्मा, योगेश मोरे, अब्दुल सिकलगार, सुरज कारळे, राजू गुणवंत, विश्वास शिंदे, गौरव पोहरे, विजय महल्ले, बापू शिंदे आदी सहभागी झाले होते.
महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी महायुतीला विजयी करा – रूपाली चाकणकर
अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर प्रचार दौरा
RELATED ARTICLES
New Delhi
mist
28.1
°
C
28.1
°
28.1
°
83 %
0kmh
40 %
Fri
33
°
Sat
38
°
Sun
38
°
Mon
38
°
Tue
36
°