28.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeक्रीड़ाएमआयटी डब्ल्यूपीयूत ‘स्पोर्टस अ‍ॅडव्हॉयझरी बोर्डची’ स्थापना

एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘स्पोर्टस अ‍ॅडव्हॉयझरी बोर्डची’ स्थापना

विद्यापीठात क्रीडा संस्कृती वाढविणे व क्रीडा क्षेत्राला नव संजीवनी देणे

पुणे : क्रीडा क्षेत्रातील मातब्बर देश म्हणून उदयास आणायचे असेल, तर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे, क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करणे, अनुभवी खेळाडूंचा सल्ला व मार्गदर्शन घेणे, विद्यापीठ स्तरावर खेळाबाबत सकारात्मक विचार विकसित करणे आणि क्रीडा कार्यक्रमांबाबत जागरूकता निर्माण करणे. हा मुख्य उद्देश ठेऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने प्रथमच ‘स्पोर्टस अ‍ॅडव्हायझरी बोर्डची’ स्थापना केली.
डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाच्या वतिने स्थापित करण्यात आलेल्या ‘स्पोर्टस अ‍ॅडव्हायझरी बोर्ड’ची पहिली बैठक डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर हॉलमध्ये संपन्न झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी वरील निर्णयाला संमती दर्शवून लवकरात लवकर कार्यास सुरूवात करण्यात येणार आहे.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, डब्ल्यूपीयूचे क्रीडा संचालक डॉ.पी.जी. धनवे व सह संचालक अभय कचरे उपस्थित होते.


या ‘स्पोर्टस अ‍ॅडव्हायझरी बोर्ड’ मध्ये देशातील नामांकित क्रीडा खेळाडूंपैकी अंजली भागवत (शुटींग, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड), शांताराम जाधव (कबड्डी, अर्जुन अवॉर्ड), मनोज पिंगळे (बॉक्सिंग, अर्जुन अवॉर्ड),श्रीरंग इनामदार (खो खो, अर्जुन अवॉर्ड), अभिजित कुंटे (बुद्धिबळ, ध्यानचंद पुरस्कार), प्रा. विलास कथुरे (कुस्ती, शिव छत्रपती पुरस्कार), मनोज एरंडे (स्विमिंग, शिव छत्रपती पुरस्कार), अजित जरांडे (जिम्नॅस्टिक, शिव छत्रपती पुरस्कार), योगेश धाडवे ( ज्यूडो, शिव छत्रपती पुरस्कार), वैशाली फडतरे (व्हॉलीबॉल, शिव छत्रपती पुरस्कार), डॉ. कौस्तुभ राडकर (आयर्न मॅन, शिव छत्रपती पुरस्कार), डॉ. पल्लवी कवाणे (योगा, वर्ल्ड चॅम्पियन), कपीलेश भाटे ( हॉर्स रायडींग, आंतरराष्ट्रीय खेळाडू ), मंदार ताम्हाणे (फूटबॉल, सीईओ नॉर्थ इस्ट युनायटेड फूटबॉल क्लब), असिम पाटील (ई स्पोर्टस आणि इंडस्ट्रीयलिस्ट), सुंदर अय्यर (सचीव, भारतीय लॉन टेनिस संघटना), कमलेश पिसाळ (सचिव, एमसीए), अपुर्व सोनटक्के (बास्केटबॉल, आंतरराष्ट्रीय खेळाडू), उमेश झिरपे (एव्हरेस्ट वीर), योगेश नातू (फूटबॉल), डॉ. अजित मापारी (स्पोर्ट मेडिसिन), डॉ. स्वरूप सवनूर (मेंटल ट्रेनिंग कोच ) आणि मिंलिंद ढमढेरे (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) यांचा समावेश असून ते बैठकीला उपस्थित होते.
 या व्यतिरिक्त रेखा भिडे (हॉकी, अर्जुनी अवॉर्ड), कमलेश मेहता (टेबल टेनिस,अर्जुन अवॉर्ड) व आदित्य कानिटकर (गोल्फ कोच) हे ऑनलाईन उपस्थित होते.
बैठकीमध्ये मान्यवरांनी विचार मांडून क्रीडा विषयक शास्त्रोक्त माहिती, क्रीडा विषयक उपक्रम, राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताहाचे आयोजन करणे आणि बोर्डाच्या माध्यमातून खेळाडूंना भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी परिपूर्ण मदत केली जाणार आहे. डब्ल्यूपीयूच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला आवश्यक आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक उपलब्ध करून खेळाडूंना मार्गदर्शन दिले जाईल. विभिन्न खेळासाठी आवश्यक अत्याधुनिक क्रीडा सुविधा, विद्यापीठ स्तरावर पुण्यातील व खाजगी विद्यापीठांमध्ये विभिन्न खेळाच्या लीग स्पर्धेचे आयोजन आणि भविष्यात स्पोर्टस युनिव्हर्सिटी उघडण्याचा मानस आहे. क्रीडा संस्कृतीला वृध्दिगत करण्यासाठी बहु आयामी दृष्टीकोण ठेऊन यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासन, क्रीडा तज्ज्ञ आणि व्यापक समुदाय यांचा समावेश आवश्यक आहे.या बैठकीला एमआयटी डब्ल्यूपीयूचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थिती होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
78 %
4.6kmh
97 %
Mon
29 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!