मुंबई- पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी यांनी देवेन्द्रजी फडणवीसांची मुंबईत जाऊन भेट घेतली व त्यांचेकडे पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीस उद्योगमंत्री पद मिळावे अशी मागणी केली. या भेटीमध्ये संघटनेचे अध्यक्ष – संदीप बेलसरे, संचालक – संजय सातव, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक, स्विकृत संचालक- श्रीपती खुणे, जितेंद्र कुलकर्णी, उत्कर्षा कुलकर्णी यांचा समावेश होता. पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. पिंपरी चिंचवड महानगर पालिका व एम.आय.डी.सी. औद्योगिक परिसरात साधारणपणे 20 ते २५ हजार लहानमोठे उद्योग कार्यरत आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेकडे साधारणपणे ४५०० हजार लघु उद्योजक हे सभासद आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असून यामध्ये भोसरी, पिंपरी, चिंचवड, या विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. या तीनही विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार यांना पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने जाहीर पाठींबा दिलेला होता. या तीनही विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार भरघोष मताधिक्याने विजयी झाले .
पिंपरी चिंचवड शहराला उद्योगमंत्री मिळावा ; लघुउद्योग संघटनेची मागणी
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
26.3
°
C
26.3
°
26.3
°
92 %
4.8kmh
100 %
Mon
31
°
Tue
34
°
Wed
36
°
Thu
33
°
Fri
32
°