· 9 वी ते 12 वीच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
· ‘व्हॉट अनलॉक्स युअर जिनियस?’ या डिजिटल कॅम्पेनची सुरुवात
· कुटुंबाकडून मिळालेल्या ₹20,000 कोटींच्या निधीनंतर लोढा फाऊंडेशनचा उपक्रम अधिक व्यापक झाला
पुणे : लोढा फाउंडेशनच्या नुकत्याच स्थापन झालेल्या लोढा जिनियस प्रोग्रामतर्फे अशोका विद्यापीठाच्या भागीदारीने 9वी ते 12वीच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः प्रायोजित बहुवर्षीय शैक्षणिक कार्यक्रमासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2024 पासून 15 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. अभिषेक लोढा आणि त्यांच्या कुटुंबाने लोढा फाउंडेशनला दिलेल्या निधीनंतर लगेच हा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे.
लोढा जिनियस प्रोग्राम हा बहुवर्षीय उपक्रम आहे, ज्यामध्ये दरवर्षी अशोका विद्यापीठात चार आठवड्यांचा कॅम्पस अनुभव आणि वर्षभर सुरू राहणारे शिक्षण यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम सर्व प्रमुख परीक्षा मंडळांशी सुसंगत आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास अधिक सखोल करण्यास व निवडलेल्या क्षेत्रात करिअरच्या विविध मार्गांचा शोध घेण्यास याची मदत होते. या उपक्रमात सखोल विज्ञान व गणिताचे अभ्यासक्रम, उपयुक्त जीवनकौशल्ये, सातत्यपूर्ण मार्गदर्शन, आणि विशेष इंटर्नशिप या संधींचा समावेश आहे. हा कार्यक्रमांतर्गत नोबेल पुरस्कार विजेत्यांसह नामांकित शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग असून विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेपासून त्यांच्या पहिल्या नोकरीपर्यंत मदत करण्यात येते. काही निवडक विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय STEM कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी शिष्यवृत्ती संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातात.
या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना लोढा फाउंडेशनच्या हेड ऑफ एज्युकेशन महिका शिशोदिया म्हणाल्या, “लोढा जिनियस प्रोग्रॅम हा नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या लोढा फाउंडेशनचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. भारतभरातील विशेष प्रतिभावान मुलांसाठी, त्यांच्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता, शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुलांचे मूल्यमापन एका प्रवेश परीक्षेद्वारे केले जाते. या परीक्षेत विशिष्ट अभ्यासक्रमावर न भर देता वैज्ञानिक तर्कशक्ती, गणित आणि लॉजिक यावर या परीक्षेत भर देण्यात येतो. त्यानंतर त्यांच्या समस्या-निवारणाच्या क्षमतेनुसार आम्ही विद्यार्थ्यांची निवड करतो आणि प्रतिभावान विद्यार्थी निश्चित करण्यासाठी त्यांची मुलाखत घेतो आणि त्यांना ‘जिनियस’ म्हणतो. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या वर्षात या प्रतिभावान विद्यार्थ्यांना वेगाने प्रगती करण्यासाठी सुयोग्य व्यक्तींशी संपर्क साधून देतो, संधी आणि आयडिया उपलब्ध करून देतो. उद्याचे परिवर्तनकर्ते, नेतृत्व आणि समाजसेवक घडवणे हा लोढा जिनियस कार्यक्रमाचा उद्देश आहे; असे विद्यार्थी जे भारताला शाश्वत भविष्याकडे नेतील आणि राष्ट्र व समाजाच्या विकासासाठी योगदान देतील.
“लोढा जिनियस प्रोग्राम हा कठोर शैक्षणिक अध्ययन, मार्गदर्शन आणि वास्तविक जगातील अनुभव यांचा अनोखा संगम आहे. लोढा फाउंडेशनसोबत या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला अभिमान वाटतो. हा उपक्रम यंदा अधिक पुढे नेऊन शिक्षण क्षेत्र व समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या वर्षापासून भारतातील हुशार विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळत आहे. ही भागीदारी म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून भारताचे भविष्य घडवण्याच्या आमच्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक आहे,” असे अशोका विद्यापीठाचे कुलगुरू सोमक रायचौधरी यांनी सांगितले.
अशोका विद्यापीठाच्या सायन्स अॅडव्हायजरी कौन्सिलचे अध्यक्ष प्रो. के. विजयराघवन म्हणाले, “लोढा जिनियस प्रोग्राम हा केवळ एखाद्या सामान्य उन्हाळी कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. तो एक सर्वसमावेशक आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आहे. अशोकामधील आकर्षक उन्हाळी उपक्रमाच्या अनुभवासोबतच, या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभर सखोल शिक्षण, मार्गदर्शन आणि विकासाच्या संधी उपलब्ध होतात. अशोका विद्यापीठ आणि लोढा फाउंडेशन यांची भागीदारी शिक्षणाच्या माध्यमातून भारतातील भविष्यातील नेतृत्व आणि परिवर्तनकर्त्यांना सक्षम बनवण्याच्या आमच्या सामूहिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”
संपूर्ण कोर्स आणि त्यातील उपक्रमांचा सर्व खर्च लोढा फाउंडेशन उचलत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर, त्यांच्या पालकांवर किंवा शाळांवर कोणताही आर्थिक भार येत नाही.
देशभरातील प्रतिभावंत मुलांना सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी लोढा फाउंडेशनने ‘व्हॉट अनलॉक्स युअर जिनियस?’ या नावाने एक डिजिटल कॅम्पेन सुरू केले आहे. हे कॅम्पेन पालक, विद्यार्थी, शाळा, शिक्षक (प्रशिक्षक, मार्गदर्शक इ.) आणि सरकारी शिक्षण मंडळांवर लक्ष केंद्रित करते. कॅम्पेनच्या व्हिडिओमध्ये या अनोख्या कार्यक्रमाची झलक पाहायला मिळते आणि तो यूट्यूब व इंस्टाग्रामवर पाहता येऊ शकतो. हा कॅम्पेनमध्ये ‘व्हॉट अनलॉक्स युअर जिनियस? > पीपल, अपॉर्च्युनिटीज अँड आयडियाज’ या संदेशावर भर देण्यात आला आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
· पात्रता : मे 2025 पर्यंत 9वी ते 12वीमधील विज्ञान आणि गणितातील असामान्य कामगिरी केलेले विद्यार्थी.
· स्थळ : अशोका विद्यापीठ, सोनीपत येथे वार्षिक कॅम्पस अनुभव, तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून सुरू राहणारे शिक्षण.
· महत्त्वाच्या तारखा: अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2024 पासून 15 जानेवारी 2025 पर्यंत | कॅम्पस अनुभव मे 2025 च्या मध्यापासून जून 2025 च्या मध्यापर्यंत.
· शुल्क: विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचा सर्व खर्च पूर्णतः प्रायोजित.
· अध्ययन निष्पत्ती : सखोल आणि बहुविषयक शिक्षणाद्वारे विज्ञान आणि गणिताच्या क्षितिजाचा विस्तार. · अर्जासाठी भेट द्या : www.lodhageniusprogramme.com