29.7 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeदेश-विदेशमोस्ट वाँटेड दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

मोस्ट वाँटेड दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

मुंबई : मुंबई हल्ल्याचा कथित मास्टरमाइंड हाफिज सईदचा मेहुणा आणि बंदी घातलेल्या जमात-उद-दावाचा उपप्रमुख हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा लाहोरमधील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मक्कीला हृदयविकाराचा झटका आला. अब्दुल रहमान मक्की हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि लाहोरमधील एका खाजगी रुग्णालयात उच्च मधुमेहावर उपचार घेत होता.
मक्की याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, असे जमात-उद-दावा च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
अब्दुल रहमान मक्की याला हाफिज अब्दुल रहमान मक्की या नावानेही ओळखले जाते. त्याचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे झाला. मक्की दीर्घकाळापासून हाफिज सईदच्या अगदी जवळचा सहकारी आहे. त्याने लष्कर आणि जमात-उद-दावा मध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. राजकीय प्रमुख आणि लष्करासाठी निधी उभारणे यासारखी कामेही मक्कीने हाताळली.२००० मध्ये लाल किल्ला आणि २००८ मध्ये मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी मक्कीला भारतीय एजन्सींनी आरोपी मानले होते. अमेरिकेच्या वित्त विभागाने २०१० मध्ये त्याचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.7 ° C
29.7 °
29.7 °
32 %
2.6kmh
0 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!