पुणे : आता शहरातील पब कल्चरने हद्दच केली असून, एका पबने नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रणात सोबत चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीट पाठवले असल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (प्रसारमाध्यम विभाग) अध्यक्ष अक्षय जैन यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तक्रार अर्जात म्हटले आहे की, “पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे. पुणे हे देशाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यात पब्लिसिटीच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अशा कृत्यांमुळे शहराच्या प्रतिमेला तडा जात आहे. तरी योग्य ती चौकशी करून, कॅफे व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई अशी मागणी होत आहे.
पुण्यातील पबचे अनोखे आमंत्रण
RELATED ARTICLES
New Delhi
mist
10.1
°
C
10.1
°
10.1
°
87 %
1kmh
0 %
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°


