30.2 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
Homeताज्या बातम्याचिंचवडचे आमदार शंकर जगताप 'ॲक्शन मोड'वर

चिंचवडचे आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोड’वर

मतदार संघातील विकासकामांना गती देण्यासाठी घेतली बैठक

पिंपरी, – विधानसभेचे नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोड’वर असल्याचे पाहायला मिळत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे आणि मूलभूत सुविधांशी संबंधित अडचणींवर चर्चा करण्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला चिंचवड मतदारसंघातील माजी नगरसेवक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गाजवले पहिलेच अधिवेशन

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर झालेल्या नागपूर अधिवेशनात निळ्या पूररेषेतील बांधकामांसह मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत आमदार जगताप यांनी अधिवेशन गाजवले. वाहतूक समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यावर उतरत त्यांनी अधिकाऱ्यांना उपाययोजनांच्या आदेश दिले होते. त्या पाठोपाठ आयुक्तांसमवेत बैठक घेत आमदार जगताप यांनी मतदारसंघातील विकासकामांना गती दिली.

बैठकीत चर्चा झालेले मुद्दे

कचरा व्यवस्थापन व स्वच्छता:
शहरातील कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि रस्त्यांची नियमित स्वच्छता.

पाणीपुरवठा व विद्युत समस्या:
कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि वारंवार येणाऱ्या विद्युत समस्यांवर तातडीने उपाययोजना.

वाहतूक कोंडी व रस्ते सुधारणा:
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन प्रकल्पांना गती.

फुटपाथवरील अतिक्रमण:
पादचाऱ्यांच्या सोयीसाठी अतिक्रमण हटवून फुटपाथची योग्य देखभाल.

महत्त्वाचे प्रकल्प व निर्णय

बटरफ्लाय ब्रिज: रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश.

पिंपळे सौदागरचा जुना पूल: काम तातडीने सुरू करण्याची सूचना.

वाकड दत्त मंदिर रस्ता: प्रलंबित रस्त्याचे काम गतीने पूर्ण करणे.

शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर: पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आयआयटीच्या तंत्रज्ञानाचा तातडीने वापर.

मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना.

बेकायदेशीर नळ कनेक्शनवर कारवाई.

स्थापत्य, ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागासाठी पुरेशी बजेट तरतूद.

बैठकीला माजी महापौर माई ढोरे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके तसेच माजी नगरसेविका माधुरी कुलकर्णी, अश्विनी चिंचवडे, चेतन भुजबळ, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नीता पाडाळे, ज्योती भारती, अभिषेक बारणे, तानाजी बारणे, संदीप गाडे, सिद्धेश्वर बारणे, आरती चोंधे, निर्मला कुटे, सागर अंघोळकर, वैशाली जवळकर, महेश जगताप, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनावणे, शेखर चिंचवडे, राहुल जवळकर, हर्षद नढे, हिरेन सोनावणे, संकेत चोंधे, विलास पाडाळे आणि संकेत कुटे आदी उपस्थित होते.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रलंबित विकासकामांना गती देऊन नागरिकांना मूलभूत व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
30.2 ° C
30.2 °
30.2 °
88 %
5.3kmh
24 %
Tue
35 °
Wed
36 °
Thu
36 °
Fri
31 °
Sat
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!