पुणे, – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा savitribai phule univercity संघ ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेसाठी रायगडला raigad रवाना झाला आहे. ११ ते १५ जानेवारी दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे, जिल्हा रायगड येथे सदर स्पर्धा होणार आहे. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरु प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ.ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, प्रा.डॉ. देविदास वायदंडे, सागर वैद्य, प्रा. डॉ. संजय चाकणे, प्रा. डॉ. काकासाहेब मोहिते, प्रा. डॉ. मोहन वामन, प्रा.डॉ. प्रगती ठाकूर,अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे विभाग प्रमुख संचालक प्रा.डॉ.संजय ढोले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठातील विविध विभागाचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील ४८ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेत सहभागी संघासाठी आय.क्यू.ए.सी. विभागाचे संचालक प्रा. (डॉ.) संजय ढोले sanjay dhole यांच्या मार्गदर्शनाखाली संघ व्यवस्थापक प्रा.(डॉ.) मोहन वामन, प्रा.(डॉ.) प्रगती ठाकूर, वरिष्ठ सहाय्यक दीपक नरके, कनिष्ठ सहाय्यक सूर्यकांत व्हनगावडे, डॉ. ज्योती पाटोळे, संदीप वाघुले, जयेश पाटील, प्रथमेश कांबळे विजय वाडकर यांनी मेहनत घेतली आणि ही स्पर्धा पूर्ण होईपर्यंत हे सर्व संघासोबत आहेत. ही स्पर्धा सहा विभागात होत असून यूजी, पीजी आणि पीपीजी अश्या एकूण तीन गटांसाठी घेतली जाते. विद्यापीठातर्फे यूजी १८ आणि पीजीसाठी १८ तर पीपीजीसाठी १२ प्रकल्प सहभागी होणार आहे. दरम्यान या स्पर्धेआधी विद्यापीठाने विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा घेतली होती. ज्यात पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक आणि अहमदनगर जिल्हातील विविध महाविद्यालयातून जवळपास 2700 प्रकल्प विद्यापीठाकडे आले होते. या प्रकल्पातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ४८ प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. याआधी या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ९ वेळा विजेतेपद मिळाले आहे