30.1 C
New Delhi
Saturday, March 15, 2025
Homeताज्या बातम्यापुरस्काराच्या माध्यमातून व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याला 'प्रेरणा' देण्याचे काम- केंद्रीय मंत्री मोहोळ

पुरस्काराच्या माध्यमातून व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याला ‘प्रेरणा’ देण्याचे काम- केंद्रीय मंत्री मोहोळ

 अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : मोहिते कुटुंबाने आपल्या माऊलीच्या स्मृती जपताना त्यांनी कुटुंबासाठी, समाजासाठी केलेल्या कार्याची जाणीव सर्वांना व्हावी, यासाठी वेगळा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या प्रेरणेतून समाजाला नवी दिशा देणाऱ्यांना प्रोत्साहान मिळावे, यासाठी ‘माऊली पुरस्कार’ आणि ‘प्रेरणा पुरस्कार’ prerana purskar देण्यात येतात. पुरस्काराच्या माध्यमातून व्यक्ती, संस्थांच्या कार्याला प्रेरणा देण्याचे काम होते, असे मत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ muralidhar mohol यांनी व्यक्त केले.

अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हाॅल मध्ये ७ व्या  माऊली पुरस्कार  व प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हेमंत रासने, माजी मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, अॕड. प्रताप परदेशी, चंद्रशेखर देठणकर माजी पोलीस अधिकारी आदी  उपस्थित होते.  

हेल्थकेअर सायंटिफिकचे प्रविण कवितके  यांच्या मातोश्री शोभा अरविंद कवितके यांना
माऊली पुरस्कार आणि सरहद, पुणे संस्थेला प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  शैलेश वाडेकर यांनी पुरस्कार स्विकारला. अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने मणिपूर येथील विस्थापित बांधवांना १०० ब्लँकेट ची मदत करण्यात आली.

शैलेश वाडेकर म्हणाले, आपल्या देशाच्या सीमेवर शांतता असली तरी आज काश्मिर पेक्षा ईशान्य भारतातील परिस्थिती गंभीर आहे. मणिपुर मध्ये अनेक कुटुंब विस्थापिताचे जिणे जगत आहेत, त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे.

हेमंत रासने म्हणाले, मोहिते कुटुंबाने सुरू केलेले हे पुरस्कार समाजासाठी आदर्श आहेत. माऊलींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांना यापुढे प्रमुख पाहुण्या म्हणून सुद्धा महिलांना बोलवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रंगनाथ नाईकडे, प्रविण कवितके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता ढमाल यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया निघोजाकर यांनी केले तर विक्रांत मोहिते यांनी आभार मानले.  कार्यक्रमाचे संयोजन सारिका खराडे, शितल देशमुख, सचिन धुमाळ, श्रद्धा झंजाड, विराज मोहिते, कृतिका मोहिते, भाग्यश्री मोहिते, शिवाली मोहिते यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
30.1 ° C
30.1 °
30.1 °
32 %
4.1kmh
40 %
Sat
35 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
34 °
Wed
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!