28.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeमनोरंजनबिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन ३'ची घोषणा

बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन ३’ची घोषणा

पुणे : भारतातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कपैकी एक असलेले बिग एफएम मराठी चित्रपट उद्योगाचा वारसा साजरा करत आपला बहुप्रतिक्षित शो बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे subhod bhave घेऊन येत आहे. मराठी चित्रपटातील मनोरंजक किस्से आणि नॉस्टॅल्जिक प्रवासासाठी ओळख असलेल्या या शोच्या तिसरा सीझनची औपचारिक घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. नाविन्यपूर्ण थीम आणि आकर्षक आशयाने भरलेला हा नवा सीझन मराठी सिनेमाच्या अनोख्या आणि कालातीत वारसा गौरव करेल. तसेच श्रोत्यांचे मराठी सिनेमाशी असलेले नाते बळकट करेल. हा शो पुण्यात सोमवार-शनिवारी संध्याकाळी ७ ते ८ आणि रविवारी, सकाळी ७ ते १० या वेळेत पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी फक्त बिग एफएमवर २७ जानेवारी रोजी प्रीमियरसाठी सज्ज आहे.

अष्टपैलू प्रतिभा असलेले अभिनेते, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक सुबोध भावे पुन्हा एकदा यजमानपदाची धुरा सांभाळत मराठी चित्रपटसृष्टीचे सार आणि माहात्म्य सांगणार आहेत. आपल्या उत्कृष्ट निवेदनाच्या माध्यमातून सुबोध भावे हे प्रेक्षकांना सिनेसृष्टीच्या रोमांचक सफरीवर घेऊन जातील आणि त्यातील सर्वोत्कृष्ट क्षण पुढे आणतील. सीझन ३ हा मनोरंजक अशा ‘जोडी स्पेशल’ संकल्पनेवर आधारित असेल, यामध्ये काही प्रतिष्ठित जोड्यांचा गौरव करण्यात येईल. यात ऑन-स्क्रीन आवडत्या जोड्यांपासून ते गायक-संगीतकार, दिग्दर्शक-अभिनेता आणि गीतकार-संगीतकार यांच्यासारख्या सर्जनशील सहकाऱ्यांचा समावेश असेल. यात श्रोते त्यांच्या आवडत्या ताऱ्यांना गाणी समर्पित करून त्याला वैयक्तिक स्पर्श देऊ शकतील. त्यातून चाहते आणि त्यांच्या प्रिय दिग्गजांमध्ये अनोखा बंध निर्माण होईल.

बिग मराठी बायोस्कोपचा तिसरा सीझन मराठी इंडस्ट्रीची जादू उलगडून दाखवेल. यात अपरिचित कथांचा शोध घेत सकारात्मक सामाजिक बदल घडवणाऱ्या सेलिब्रिटींच्या जीवनाचा वेध घेण्यात येईल. मनोरंजन आणि अर्थपूर्ण निवेदनाच्या या मिलाफातून मराठी चित्रपटसृष्टीला मनापासून दाद मिळेल. त्यातून संस्कृती आणि समुदाय दोन्हींचा गौरव होईल.

आपला उत्साह व्यक्त करताना सुबोध भावे म्हणाले, “बिग मराठी बायोस्कोपचा आणखी एक सीझन होस्ट करताना मला खूप आनंद होत आहे, विशेषत: गेल्या दोन सीझनमध्ये प्रेक्षकांच्या असामान्य प्रतिसादानंतर. माझ्या दृष्टीने निवेदनाची खरी ताकद ही अर्थपूर्ण बंध निर्माण करण्याच्या क्षमतेमध्ये असते. या बंधाला पोषक ठरणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बिग एफएमचा आभारी आहे. हा सीझन नवीन घटक घेऊन येत आहे आणि तो श्रोत्यांच्या मनाला अजूनही अधिक साद घालेल. त्यामुळे ते कलावंत आणि त्यांना आवडत असलेल्या गोष्टींच्या आणखी जवळ येतील, याची मला खात्री आहे.”
बिग एफएमचे सीओओ सुनील कुमारन पुढे म्हणाले, “बिग एफएमवर प्रेक्षकांशी वैयक्तिक पातळीवर जोडणारा आशय तयार केल्याचा आम्हाला अभिमान आहे. बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे हा कार्यक्रम याचा अस्सल पुरावा आहे. मागील दोन सीझनच्या प्रचंड यशामुळे मराठी सिनेसृष्टीच्या चाहत्यांचा या शोसोबतशी असलेला गहिरा संबंध स्पष्ट होतो. सुबोध भावे हे होस्ट असल्यामुळे तिसरा सीझन प्रेक्षकांच्या सहभागाचा नवीन मापदंड निर्माण करेल, याचा आम्हाला विश्वास आहे. या प्रवासाला आकार देणाऱ्या प्रायोजकांच्या दृढ पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत.”

एक विलक्षण अनुभव देण्याची खात्री असलेल्या बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन ३ चे प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड हे असून देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर सह-प्रायोजक आहेत. व्हॅलेंटीना इंडस्ट्रीज हे सहयोगी प्रायोजक असून त्यांना टेलिकास्ट पार्टनर म्हणून साम टीव्ही यांची साथ आहे. इंडियन ऑईल या कार्यक्रमाचे पार्टनर आहेत. हा शो सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये प्रसारित होईल. रविवारी पुणे, मुंबई, गोवा, इंदूर आणि नागपूर येथे सकाळी ७ ते १० आणि अहिल्यानगर , छत्रपती संभाजी नगर, सोलापूर आणि कोल्हापूर येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत त्याचे प्रसारण होईल. या सीझनचा समारोप पुण्यात एका ग्रँड फिनालेने होईल, त्यात मराठी चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणाऱ्या प्रतिष्ठित सेलिब्रिटी जोडींचा समावेश असेल. बिग एफएमच्या ऑन-एअर प्रोग्रामिंग, सोशल मीडिया चॅनेल आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरील व्यापक प्रमोशनमुळे या शोची पोहोच आणखी वाढली आहे. त्यामुळे व्यापक प्रसार आणि सहभागाची खात्री मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
28.1 ° C
28.1 °
28.1 °
83 %
0kmh
40 %
Fri
33 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!